यह दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, अनेक वर्ष उलटली पण …..

0
440
We will not break this friendship, many years have passed ritesh deshmukh

यह दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, अनेक वर्ष उलटली पण …..

आयुष्यात कितीही यशाची शिखरं गाठली, कितीही मोठं नाव कमावलं तरी जो आपल्या मित्रांना कधीच विसरत नाही, तोच मैत्रीच्या नात्याशी एकनिष्ठ राहतो, असं म्हणतात. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा, कर्तृत्वाचा ठसा उमटविणारा अभिनेता रितेश देशमुख. रितेशने अभिनेता म्हणून नाम कमावलं, मात्र आजही तो त्याच्या मित्रांना विसरलेला नाही. सोशल मीडियावरील नुकत्याच एका पोस्टवरून त्याने ही गोष्ट सिद्ध केली आणि यामुळेच सध्या त्याचं कौतुक होत आहे.

लातूरच्या बाभळगावमधील एका मित्रासोबतचा फोटो रितेशने सोशल मीडियावर नुकताच पोस्ट केला आहे. प्रकाश इरेकर असं त्याच्या या मित्राचं नाव आहे. प्रकाशच्या वाढदिवसानिमित्त रितेशने त्याच्यासोबतचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा. हा बाभळगाव, लातूर या माझ्या गावातील खास मित्र. अनेक वर्षं उलटली, पण आमची मैत्री मात्र कायम आहे’, असं रितेशने लिहिलं आहे. आयुष्यात आपण कितीही पुढे गेलो तरी काही मित्रांचं आपल्या आयुष्यातील स्थान अबाधित असतं, हेच रितेशने या पोस्टद्वारे सिद्ध केलं आहे.

riteish deshmukh ritesh deshmukh family

Leave a Reply