असं काय झालं की, लग्नाच्या अवघ्या 3 महिन्यातच विकी-कतरिनाला जावं लागलं कोर्टात

0
351
What happened was that Vicky-Katrina had to go to court in just 3 months of their marriage

बॅालिवूड मधील सर्वांची लोकप्रिय जोडी अशी विकॅट म्हणजेच विकी कौशल आणि कतरिना कैफ. या दोघांनी 9 डिसेंबर 2021 रोजी पारंपारिक पद्धतीने लग्न केले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यानंतर त्या दोघांच्या लग्नाचे फोटोज जवळपास महिनाभर सोशल मिडीयावर फिरत होते.

Vicky Katrina

लग्नानंतर लगेचच,दोघे हनिमूनसाठी रवाना झाले. हनिमून वरून परतावा केल्यावर लगेचच दोघांनी आपापल्या स्वतंत्र्य कामाला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळ त्यांचा शूटिंगमध्ये गेला. दोघेही व्यस्त झाले.

पण आता मात्र सर्व सुरळीत असताना विकी आणि कतरिना लग्नाच्या अवघ्या आता 3 महिन्यात कोर्ट गाठले आहे. त्यावर सोशल मिडीयावर देखील बऱ्याच चर्चा सुरू आहेत. मात्र यावर तसे गंभीर कोणतेच कारण नाही असे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजले जात आहे.

Vicky Kaushal

लग्नाला बराच वेळ लोटला आहे. पण कायदेशीर पद्धतीने ते काही दिवसांपूर्वी पती-पत्नी झाले आहेत. लग्नाच्या तीसऱ्या महिन्यांनंतर या जोडप्याने अखेर लग्नाची नोंदणी कोर्टात कायद्याने केली आहे. 19 मार्च रोजी, विकी कौशल आणि कतरिना कैफ कोर्टात पोहोचले. दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. त्याच रात्री, विवाह नोंदणीनंतर, ही संपुर्ण फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आनंद साजरा करताना सुद्धा दिसली.

vicky kaushal katarina

Leave a Reply