गणपतीची मूर्ती बुक करताय मग हि बातमी वाचा; सरकारकडून महत्त्वाचे निर्देश

0
458
While booking Ganpati idol then read this news; Important instructions from Govt

मुंबई : मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहीहंडी, गणेशोत्सव असे लोकप्रिय उत्सव साजरे करण्यावर बंधने आली होती.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या उत्सवांवर अनेक निर्बंध लागू होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने यावर्षी राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याची घोषणा केली आहे.गणेशोत्सव, मोहरम आणि दहीहंडीदरम्यान सर्व प्रकारचे नियम पाळावेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितले. कोविड-19 दरम्यान जे काही निर्बंध होते ते काढून टाकण्यात आले आहेत परंतु सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणेश मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

काय आहे नव्या सरकारची नियमावली

-गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी

-पीओपीच्या मूर्तींबाबत एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल.

– गणेश मूर्तीच्या उंचीसंदर्भातील मर्यादा काढून टाकण्यात आल्या आहेत.

-मंडळ उभारण्यासाठी गणेशोत्सव मंडळांसाठी सिंगल खिडकी सुरू करण्यात येणार आहे.

-दोन्ही सण-उत्सवात सर्वोच्च न्यायालयाकडून लावलेले नियम पाळले जातील.

– गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत.

-राज्यभर उत्सवासाठी एक नियमावली राहील. जिल्हा प्रशासनांनी उत्सवासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावेत.

-मुंबईमध्ये बेस्टतर्फे सर्व विसर्जन ठिकाणं तसेच विसर्जन मार्गांवर पुरेशी वीज पुरवठ्याची व्यवस्था असावी.

-दही हंडीच्या उत्सवात लहान गोविंदाबाबत (१४ वर्षांच्या आतील) न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.

-धर्मादाय आयुक्तांनी मंडळ नोंदणीसाठी ऑनलाईन व्यवस्था असावी.

-गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील ध्वनी प्रदूषण तसेच इतर काही लहान गुन्हे नोंदवले गेले असतील, ते व्यवस्थित तपासून काढून टाकण्यासंदर्भात पोलिसांनी कार्यवाही करावी.

Leave a Reply