गंगूबाई काठियावीडी चित्रपटातील ‘गंगूबाई’ नक्की आहे तरी कोण ?

0
450
Who exactly is Gangubai from the movie Gangubai Kathiyavidi

नुकताच ‘गंगूबाई काठियावाडी’ चा ट्रेलर लॅंाच झाला. त्यात तिच्या जबराट अभिनयानं सर्वांना हा चित्रपट बघण्याची उत्सुकता लागली आहे. पण आलिया भट्ट ने साकारलेल्या ‘गंगुबाई’ ची खऱ्या आयुष्यातील कहानी माहित आहे का? गंगुबाई वयाच्या १६ व्या वर्षी वेश्या वस्तीत अडकली.

aliaa bhatt gangubai

गंगुबाई अशी होती जिनं अक्षरश: बेधडकपणे एका डाॅनच्या घरात घुसून त्याला राखी बांधली. आणि अशी वेश्या जिचा फोटो प्रत्येक वेश्या महिलेच्या घरात आहे. इतकेच नव्हे तर वेश्यांच्या हक्कांसाठी थेट पंतप्रधान नेहरूंना ती भिडली होती.

गुजरातमधील काठियावाड या गावात राहणारी गंगूबाईचं संपूर्ण नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असं होतं. तिने खूप शिकावं, असं गंगूबाईच्या आई-वडिलांना वाटत होतं. पण, तिचं मन पुस्तकांत नव्हे तर मुंबईच्या फिल्मीविश्वात रमलेलं होतं.
गंगूबाई ही अभिनेत्री आशा पारेख आणि हेमामालिनीची खूप मोठी चाहती होती. तिला वाटायचं की, या अभिनेत्रींसारख आपणही चित्रपटात झळकाव. पण तिच्या नशीबी अभिनेत्री होणे मात्र राहून गेलं, पण ती एक प्रसिद्ध महिला बनली. हे मात्र खरयं!

ajaydevgn in gangubai movie

१६ वर्षांची असताना ती एका रमणीक नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. हा रमणीक गंगूबाईच्या वडिलांकडे काम करत होता. दोघांच प्रेम होतं, पण तिच्या आई-वडिलांचा यासाठी विरोध होता. म्हणून दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि दोघांनी थेट मुंबई गाठली. काही दिवस ते दोघं एकत्र राहिले. एके दिवशी रमणीकने गंगाला सांगितलं की, “मी आपल्यासाठी घर पाहून येतो. तू माझ्या मावशीच्या घरी रहा.” रमणीकने मावशीबरोबर गंगाला एका टॅक्सीमध्ये बसवलं आणि कायमचाच निघून गेला.

Alia Bhatt gangubai kathiawadi film

पण, ती टॅक्सी मावशीच्या घरी नाही तर थेट कामाठीपुरात पोहोचली. खरंतर रमणीकने गंगाशी गद्दारी करून तिला केवळ ५०० वेश्या व्यवसायात विकलेली होती. कामाठीपुरा पाहून ती गडबडली, गोंधळली, किंचाळली. पण, शेवटी तिने परिस्थितीशी तडजोड केली. ती इच्छा असूनही काठियावाड येथे जाऊ शकली नाही.सेक्सचा आनंद घेण्यासाठी आलेल्या शौकत खानने गंगूबाईवर अत्याचार केले. शौकत हा मुंबईचा कुख्यात डाॅन आणि करीमलालाचा सहकारी होता. गंगूबाईने शौकतचा पत्ता शोधून काढला आणि करीमलालाच्या घरी पोहोचली आणि तिने सर्व परिस्थिती सांगितली. करीमलालाने तिला विश्वास दिला की, “तू निर्धास्त रहा. परत तो तुझ्याकडे आला तर मला कळवं.”
गंगूबाईने करीमलाला भाऊ मानत त्याच्या हातावर राखी बांधली. पुढच्या वेळी शौकत गंगूबाईजवळ आला. तिने करीमलालाला कळवलं. करीमलाला लगेच कमाठीपुरात गाठलं आणि शौकत खानला सर्वांसमोर धू धू धुतला… त्याने सर्वांना सांगितलं की, “गंगूबाई ही माझी बहीण आहे. कुणी हात लावला तर याद राखा.”

aliaa bhatt gangubai film photos

 

गंगाचा भाऊ डाॅन करीमलाला आहे म्हटल्यावर तिचा कामाठीपुरात पुरता दबदबा निर्माण झाला. त्यानं तिने कामाठीपुराच्या निवडणुकीत भाग घेऊन निवडून आली. त्यानंतर तिनं वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी लढाई सुरू केली. ज्या मुलींना फसवून या व्यवसायात आणलं गेलं, त्या सोडवून त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्यात आलं. त्यामुळेच आपल्या कामागिरीच्या जबराट स्टाईलने गंगूबाई
जास्तच प्रसिद्ध झाली.

how is the gangubaai

कामाठीपुरात वेश्या वस्तित महिलांचं पोटपाणी चाललं होतं. पण, तोच कामाठीपुरा बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले त्यावेळी गंगूबाई थेट पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांच्यासमोर बेधडकपणे सर्व प्रश्न मांडले. व कामाठीपुरा आणि तिथल्या महिलांच्या पोटापाण्यावर आलेलं संकट बाजूला केलं.
अशा निर्भीड, बिंदास्त गंगूबाई आणि तिचं कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संजय लिला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या नावाचा तिच्या जीवनावर आधारित सिनेमा घेऊन येत आहे.

Leave a Reply