‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधली जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री नक्की कोण आहे?

0
370
who-exactly-is-the-actress-playing-the-role-of-jessica-in-majhi-tujhi-reshimgath

छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही लोकप्रिय आणि प्रसिद्ध मालिकांपैकी एक मालिका बनली आहे. अवघ्या काही भागात या मालिकेनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. दिवसेंदिवस या मालिकेच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. मालिकेतील यश आणि नेहाची जोडी आणि सर्वांची लाडकी परी प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. यश आणि नेहा ची केमिस्ट्री तर गजब आहे. दर वेळेस मालिकेत कोणता तरी नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. प्रोमो मध्ये कधी नवीन ट्विस्ट तर कधी नवीन कलाकार पाहायला मिळत आहेत. नुकताच या मालिकेने एक प्रोमो सादर केला आहे. या प्रोमोची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. आता मालिकेत एका परदेशी अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे. ती अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Jane Kataria in majhi tujhi reshimaath

आता मालिकेता नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये यशची जुनी मैत्रिणीची एंट्री दाखवण्यात आली आहे. ती यशला भेटण्यासाठी नेहा त्याच्या केबिनमध्ये जाते. त्याच खास कारण म्हणजे यशने नेहाला पाडव्याला एक ड्रेस गिफ्ट केलेला असतो. तोच ड्रेस दाखवण्यासाठी ती त्याच्या केबिनमध्ये जाते. पण त्याच तिच्याकडे लक्ष नसतं हे बघितल्यानंतर नाराज झालेली नेहा तिथून निघून जाते. हे पाहताच समीर यशला ही गोष्ट लक्षात आणून देतो आणि नेहाची स्तुती करण्यासाठी तिच्या जवळ बाहेर तिच्या डेस्क पाशी जातो.

परंतु इतक्यात यशला मागून एक हाक ऐकू येते आणि एण्ट्री त्यानंतर जेसिका नावाच्या यशच्या एका परदेशी मैत्रिणीची एण्ट्री होते. आता ही अभिनेत्री आहे तरी कोण असा प्रश्न प्रेक्षकांना लागला आहे. जेसिका ही एक रशियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने अनेक मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. या अभिनेत्रीचं नाव जेन कटारिया असं आहे. या अभिनेत्रीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांसोबत काम केले असून तीच सिनेसृष्टीत बरच नाव आहे. आहे. पण ती आता पहिल्यांदाच मराठी मालिकेत दिसणार आहे. मालिकेत आलेलं नवं वळण पाहण्यासाठी सर्व जण खूपच आतुर आणि उत्सुक आहेत.

Jane Kataria

Leave a Reply