‘जय श्रीराम’च्या घोषणासोबत ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा देणारी ती तरुणी कोण?

0
371
Who is the young lady who announces 'Allahu Akbar' along with 'Jai Shriram'

कर्नाटकच्या कॉलेजमधील एक व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आहे. यात एक मुलगी जोरजोरात ‘अल्लहू अकबर’ ची घोषणा देत होती. तर ही घोषणा देणारी मुलगी आहे तरी कोण? या मुलीच नाव मुस्कान आहे. ती हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात करू लागला. यानंतर तरुणीदेखील त्यांना उत्तर देत ‘अल्लाहू अकबर’ ची घोषणा दिली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओवर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या ट्विटरच्या माध्यमातून या मुलीला केलं आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी तरुणीला सलाम केला आहे. “मी या तरुणीच्या आई-वडिलांना सलाम करतो. या मुलीने एक उदाहरण ठेवलं आहे”. भीख मागून आणि रडून काही मिळत नाही असं ओवैसी या व्हिडीओत म्हणाले आहेत. या मुलीने जे काम केलं त्यासाठी फार धाडस लागतं

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांवरही देखील निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आहे का? मग यावर मोदी कसे काहीच बोलत नाहीयत.

इंडिया टुडेसोबत झालेल्या संभाषणादरम्यान मुस्कानने म्हणाली, आम्ही कॉलेजमध्ये एका असाईनमेंटसाठी गेलो होतो. आणि ते लोक आम्हाला कॉलेजमध्ये जाऊ देत नव्हते. बुरखा हटवल्यानंतरच आत जायचं असं ते सांगत होते. जेव्हा मी गेले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यामध्ये काही कॉलेजच्या आतील तर अनेक बाहेरचे होते. शिवाय शिक्षक व प्राध्यापकांनी सुद्घा पाठिंबा दिला.

 

Leave a Reply