सुहानासोबत अनन्यानं असं का केलं असेल? तिच्या असं वागण्याने सुहानाला आला राग!

0
374
Why did Ananya do this with Suhana Suhana got angry because of her behavior

बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या फॅशन लूक आणि तिच्या अलल्डगीमुळे चर्चेत असते. नुकताच तिचा दीपिकासोबत गहराईया नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला असून , नेटकऱ्यांकडून मोठ्य़ा प्रमाणात सर्वांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र आता अनन्याने चक्क शाहरूखच्या लेकीसोबत पंगा घेतलाय. या दोघींमध्ये काही कारणास्तव वाद झाला आहे. आणि हा वाद सोशल मीडिय़ावर व्हायरल देखील झाला आहे.

असं बघायला गेलं तर सुहाना आणि अनन्या या दोघीजणी एकमेकांच्या चांगल्या मैत्रीणी आहेत. सुहाना आता लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यु करणार आहे. सुहाना काही दिवसांपूर्वी बॉलीवूडची प्रसिद्ध दिग्दर्शक झोया अख्तरच्या ऑफिसमध्ये दिसून आली होती. मात्र सुहाना आता तिच्या बेस्ट फ्रेंड अनन्यामुळे चर्चेत आली आहे. झाले असे की, सुहाना आणि अनन्या हे एका हॉटेलमधील पूलमध्ये मजा करत होते. तेव्हा अनन्याच्या कृतीमुळे सुहाना तिच्यावर चांगलीच भडकल्याचे दिसून आले आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सुहानाला अनन्याचा भलताच राग आल्याचे त्यातून दिसले.

Suhana Khan ananyapanday

अनन्यानं आपली छोटी बहिण रायसाचा 18 वा जन्मदिवस मोठ्या आनंदात साजरा केला. यावेळी सुहानाही उपस्थित होती. या सेलिब्रेशनचे फोटो अनन्यानं सोशल मीडियावर व्हायरल केले असून त्यामध्ये रायसा आणि अनन्या जेवत असल्याचे दिसते. त्या फोटोवरुन सुहाना अनन्यावर चांगलीच भडकली आहे. आपणही त्या पार्टीमध्ये होतो. मात्र आपला फोटो क्रॉप करुन अनन्यानं तो फोटो शेयर केल्यानं सुहाना संतापली होती. त्या फोटोला कॅप्शन देताना सुहानानं लिहिलं आहे की, मला फोटोतून क्रॉप केल्याबद्दल धन्यवाद.

Suhana Khan

ananyapanday

Ananya pandey

Leave a Reply