का बरं शेअर केला सलमान खाननं आईसोबतचा सेल्फी!

0
383
Why did Salman Khan share a selfie with his mother

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सर्व प्रेक्षकांचा चाहता आहे. शिवाय सोशल मीडियावर तो बराच सक्रिय असतो. अनेकदा सलमान खान सोशल मीडिया पोस्टवरून चर्चेत असतो. आता नुकताच त्यानं आपल्या सोशल मीडियावरून आपल्या आईसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः या फोटोला दिलेलं सलमानचं कॅप्शन जास्त चर्चेचा विषय ठरत आहे.

सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचं शेवटचं शेड्युल बाकी आहे. त्यापूर्वी सलमान घरीच त्याच्या आईसोबत काही वेळ सोबत होता. त्यामुळे सोशल मीडिया पोस्टवरून अशी दिसून येत आहे. सलमाननं इन्स्टाग्रामवर नुकताच त्याच्या आईसोबतचा एक सेल्फी शेअर केला. ज्यात ती आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने त्याला साजेसं कॅप्शनही दिलं आहे.
सलमाननं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आईच्या मांडीवर… स्वर्ग’ असं लिहिलं आहे. सलमानच्या या पोस्टचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होत असून यावर लाईक्स आणि कमेंट चा वर्षाव होत आहे.

आता सलमान खानच्या सर्व प्रेक्षकांना त्याच्या अपकमिंग सिनेमाची उत्सुकता लागली आहे. सलमानचा सर्व चाहता वर्ग त्याच्या ‘टायगर ३’ ची अगदी पराकोटीने वाट बघत आहे.

Leave a Reply