तू मला पहिल्याच दिवशी आवडली होतीस; असे म्हणत स्वीकारली लाच

0
331
You loved me the first day; Accepted saying bribe

तू माझ्या मनात बसलीस, तू मला पहिल्याच दिवशी आवडली होतीस,
असे म्हणत हात पकडून एका महिलेकडून एका कनिष्ठ लिपिकाने लाच स्वीकारल्याचा त्रासदायक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला. उस्मानाबाद पोलीस अधिक्षक कार्यालयात हा धक्कादायक प्रकार घडले आहे. या लिपिकाविरुद्ध अनैतिकता आणि लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून ही कारवाई उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

bribe india

कनिष्ठ लिपिकाचे नाव एजाज अजीम शेख असे आहे. उस्मानाबाद पोलीस अधिक्षक कार्यालयामधील २७ वर्षी महिला कर्मचारी यांनी बदलीबाबत अर्ज केला होता. कनिष्ठ लिपिक एजाज अजीम शेख याने कार्यालयामधील वरिष्ठ लिपिक देसाई यांना सांगून बदली करून देण्यासाठी १०,००० रुपयांच्या लाचे देण्याची मागणी काल म्हणजे २२ जून (बुधवारी )केली होती. एजाज अजीम शेख आज त्यांच्याकडून १०,००० रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली आहे.

bribe

परंतु अजीम शेख याने लाच स्वीकारताना असताना महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला. लाच घेत असताना तू माझ्या मनात बसलीस, तू मला पहिल्याच दिवशी आवडली होतीस, असे म्हणत अजीम शेखने महिला कर्मचाऱ्याचा हात धरून विनयभंग केला. या प्रकरणामध्ये शेख याला ताबडतोब ताब्यात घेण्यात आले आहे. ।उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली असून विभागाचे प्रमुख अशोक हुलगे यांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्या पथकात विशाल डोके, अविनाश आचार्य, शिधेश्र्वर तावसकर, विष्णु बेळे यांचा देखील समावेश होता.

Leave a Reply