रात्रीच्या वेळी तुमच्या बाईकवर कुत्रे भुंकत असतील; तर हा उपाय वापरा

0
402
Dogs will bark at your bike at night So use this solution

आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनीच हा अनुभव घेतला असेल. की बहुतेकरून रात्रीच्यावेळी दुचाकीच्या पाठीमागे कुत्रे लागतात. त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघात देखील होत असल्याचे आपल्याला दिसते. तुम्ही देखील रात्रीच्या वेळी गाडी चालवत असताना हा अनुभव नक्कीच तुम्हाला आला असणार. रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुत्रे असतात, अशा रस्त्यावरून बाईकवाले जातात असतात तेव्हाच रस्त्यावर कुत्रे दुचाकीवर भुंकतात आणि त्याच्या मागे धावत असतात आणि त्याचा पाठलाग करतात.

रात्रीच्या वेळी कुत्रे पाठीमागे आणि भुंकयला लागले की, लोक जोरदार गाडी पळवतात, मात्र अस करण्यापेक्षा या परिस्थीला कसं हाताळायचं हे अनेक लोकांना माहितीच नसते. तर आज आम्ही तुम्हाला अशाच अनेक उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर जर तुम्ही केलात तर कधीच तुमच्या पाठीमागे आणि भुंकणरे कुत्रे लागणार नाहीत.

Dogs will bark at your bike at night

कुत्र्यांना दुचाकीच्या पाठलाग रोखण्यापासून व भुंकण्यापासून कसं थांबवायचं?

खरं तर एक मार्ग आहे, ज्याचा वापर करून तुम्ही दुचाकीवरून पाठलाग करण्यापासून आणि भुंकण्यापासून कुत्र्यांना रोखू शकता. ही एक मानसिकदुष्टया उपाय आहे. तुम्ही कधी याबाबतीत नीटपणे विचार केला. तर तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही जेव्हा उच्च गती बाईकवर असता.
तेव्हा कुत्रे तुमचा पाठलाग करतात आणि तुमच्यावर भुंकतात. याचा खर कारण त्यांना धावणारी गोष्ट पकडायची असते.

मात्र तुम्ही जर त्याच्या पूर्णपणे उलटे केले तर, म्हणजे तुम्हाला वाटेत कुत्रा दिसला, तर तुमची बाईक स्लोकरा आणि मग तेथून जा, असं केल्याने कुत्रा तुमच्या पाठीमागे लागणार नाही किंवा भुंकणार पण नाही. तसेच तुम्ही कुत्र्यांकडे पाहू नका. कुत्रे तुम्हाला घाबरवण्याचा किंवा तुमच्यावर भुंकण्याचा प्रयत्न सुध्दा करणार नाही. दरम्यान गरज भासल्यास बाईक थांबवून हळू हळू चालहून तुमच्या मार्गावरून पुढे जा. असे केल्यास कुत्रे तुमच्यावर भुंकणे बंद करतील आणि पाठलाग करणार नाही. तसेच मग थोडं पुढे गेल्यावर तुम्ही दुचाकीचा स्पीड वाढवून पुढे जाऊ शकता.

Leave a Reply