रावणाने स्त्रीविषयी वाईट पण सत्य अशा या गोष्टी सांगितल्या होत्या…!

0
824
Ravan-expalin-truth-female-secrets-face-truth-words-ramayan-ram-laxman-sita-kalyuga-satyuga
‘रामायण’ हिंदू धर्मातील एक सर्वात पवित्र ग्रन्थ. रामायण हे एक महाकाव्य असून त्याची रचना वाल्मीकी ऋषींनी केली होती. एक आदर्श राज्य म्हणून रामाचे राज्य मानले जाते. रामायणाची मुख्य कथा अयोध्येच्या राजपुत्रांपासून सुरु होऊन, रामाची पत्‍नी सीतेचे रावणाकडून अपहरण, आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे.

पण रामायण म्हंटले कि ते फक्त राम ह्यांच्यावरच केंद्रित न राहता ते आपल्याला त्यातील इतर पात्रांच्या भूमिका आणि त्यांचे व्यक्ती चित्रण ह्या मुळे ही लक्षात रहाते. मग राम ह्यांचे लहान भाऊ असोत, त्यांची पत्नी सीता आणि त्यांचा सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून प्रसिद्ध असलेले महाबली हनुमान असो. हे सर्व आपल्याला काही ना काही जीवन बोध देत असतात. रामायणातील रामा इतकंच महत्वाचे आणि सशक्त पात्र म्हणजे महाज्ञानी आणि महापराक्रमी म्हणून प्रसिद्ध असलेला रामायणातील खलपुरुष म्हणजेच लन्काधिपती आणि भगवान शंकराचा अनन्य भक्त असा राक्षस राज ‘रावण’.

रावण इतका महाज्ञानी व महापराक्रमी होता की त्याला आता मृत्यू चे ही भय राहिले नव्हते. आणि त्याच मुळे भगवान श्री विष्णू ह्यांना रामाचा अवतार घ्यावा लागला. रावणाचा मृत्यू हा केवळ त्याच्या एका चुकी मुळे झाला , आणि ती चूक होती की त्याने एका स्त्री चे तिच्या इच्छे विरुद्ध केलेले अपहरण.

सीतेचे अपहरण झाल्या नंतर तिच्या सुटकेसाठी जेव्हा श्री राम आपल्या वानर सेने सोबत लंके ला पोहोचले तेव्हा घाबरलेल्या मंदोदरी ने म्हणजेच रावणाच्या पत्नीने, रावणाला विंनती केली की त्याने कृपा करून सीता मातेला आदर पूर्वक श्री राम ह्यांना परत करावे. पण आपल्याच अहंकारात मग्न असलेला रावण मंदोदरी वर हसला आणि त्याने त्यावेळेस मंदोदरी हिस स्त्रियांविषयी अशी तीन गुपित सांगितले ज्याची प्रचीती आज ही आपल्याला येते.

रावणाने मन्दोदरीस स्रियांविषयी सांगितलेली पहिली गोष्ट अशी की स्त्रियांसोबत कधीही आपले गुपित वाटू नये. स्त्रिया ह्या कधीही कुठल्याही गोष्टीला गुपित ठेवू शकत नाही. एक तर एक स्त्री ही दुसऱ्या स्त्री चा कायम मत्सर करत असते आणि दुसऱ्या स्त्री विषयी त्या कधीच चांगले बोल्ट नसतात. म्हणून स्त्री यांना जर तुम्ही एखादे गुपित सांगितले तर ते लगेचच बाहेर येते.

रावणाने मन्दोदरीस स्रियां विषयी सांगितलेली दुसरी गोष्ट अशी की स्त्रिया पुरुषाला केव्हाही धोका देऊ शकतात. कलियुगात तर स्त्रिया इतक्या मतलबी असतील की त्या आपला हेतू साध्य करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतील.

आणि सर्वात शेवटी रावणाने मन्दोदरीला सांगितले की स्त्री कधीही आपल्या मतावर ठाम राहू शकत नाही. आणि त्या एखाद्या गोष्टीवरून केव्हाही पलटून जाऊ शकतात. त्या मुळे स्त्रियावर विश्वास ठेवणे कठीण असते.

मंडळी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आमचा हेतू स्त्री जातीचा अपमान करण्याचा अजिबात नाही आहे. आम्ही सर्व स्त्रियांचा आदर करतो. ह्या लेखाद्वारे फक्त आणि फक्त पुराणातील रोचक माहिती आपल्याला द्यावी इतकाच आहे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply