वेदव्यासांची कलियुगाबाबतची केलेली भविष्यवाणी एकूण तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल…!

0
850
bhavisyavani-vaidya-future-predection-truth-rason-kalyug-kalyuga

भारतीय प्राचीन शास्त्रांमध्ये चार प्रकारच्या युगांचा उल्लेख केलेला आपण पाहिलेला असेल. ज्यामध्ये सत्ययुग, द्वापर युग, त्रेता युग ही युगे होऊन गेली आहेत. या युगांमध्ये भगवान विष्णूने अनेक अवतार घेऊन मानव जातीच्या कल्याणाकरता काम केले आहे. एक युग म्हणजे अनेक वर्षांचा कालावधी असतो.  पुराणशास्त्रानुसार सध्या कलियुग चालू आहे असे म्हटले जाते.

आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला महर्षी व्यास यांनी सांगितल्यानुसार कलियुगामध्ये काय घटना घडतील? याबद्दल माहिती देणार आहोत.

कसे असेल कलियुग?

महर्षी व्यास यांच्या मते कलियुगामध्ये धनाकरता लोक लोभी होतील.  कर्मकांड करणाऱ्या खोट्या साधुसंतांचा उद्गम होईल. मनुष्य कलियुगामध्ये वर्ण आणि आश्रम यासंबंधीच्या प्रवृत्तींना मानणार नाही. कोणालाही वेदांचा आदरसत्कार करणार नाही. धर्माच्या नावावर पुजारी लोक अनेक खोटे-नाटे यज्ञयाग करून देतील. देवपूजा अतिथींचा आदर, श्राद्ध, तर्पण यासारखे विधी कोणीच करणार नाहीत. गुरु-शिष्य परंपरा लयास जाईल.  मुले आपल्या आई-वडिलांचा मान ठेवणार नाहीत. ज्याच्याकडे बल आहे तोच व्यक्ती अधिकार गाजवेल.

कलियुगातील मुले-

कलियुगामध्ये मुले वडिलांना व सुना सासूला काम करायला सांगतील. कलियुगामध्ये सर्व मनुष्य  दंभी आणि अज्ञानी होतील. संकटे आल्यावर सगळ्यांचा नेता किंवा राजा प्रजेच्या कामी येणार नाही. कलियुगामध्ये मनुष्यामध्ये क्रोध आणि लोभ जास्त प्रमाणात पाहायला मिळेल.

कलियुगातील स्त्रिया-

वेदव्यास असे म्हणतात की, कलियुगामध्ये लोक मुलींना विकून आपले उदरनिर्वाह करतील. कलियुगातील स्त्रिया लोभी, बुटक्या,  अधिक जेवणार्‍या आणि मंद भाग्य असलेल्या असतील. या युगातील स्त्रिया आपल्या इच्छेनुसार आचरण करतील. खोटेनाटे बोलून पैसा कमावणाऱ्या पुरुषांबद्दल त्या स्त्रियांना आकर्षण राहील.

कलियुगातील स्त्रिया गरीब पतीचा त्याग करतील व ज्या पुरुषांकडे जास्त संपत्ती असेल, त्यांकडे स्त्रिया जातील. कटुवाणी आणि असत्य बोलण्याकडे जास्त भर राहील. एवढेच नाही तर दुराचारी पुरुषांसोबत भेटण्याची अपेक्षा देखील या काळात स्त्रिया करतील.

कलयुगात पैसा सर्व काही राहील
वेदव्यास यांनी सांगितले आहे की, कलियुगामध्ये लोक  ज्याच्याकडे पैसा त्या लोकांशीच संबंध जोडले जातील. कलियुगामध्ये लोक कर्जफेड न करता पैसे हडपतील. कलियुगातील लोक पुर, दुष्काळ यामुळे त्रस्त राहतील. सर्व लोकांचे डोळे आकाशाकडे लागलेले असतील, मात्र पाऊस पडणार नाही. पाऊस न पडल्यामुळे तपस्वी लोकांसारखे फळे, कंदमूळे, पाने खाऊन जगावे लागेल.

कलियुगामध्ये कायम दुष्काळ पडत राहील. घोर कलियुग आल्यावर बोल कलियुगामध्ये जास्त वर्ष जगणार नाहीत. त्यावेळी पाच, सहा, सात वर्षाच्या स्त्रिया व आठ, नऊ, दहा वर्षाच्या पुरुषांनाही मुले होतील. अशावेळी लोक मंदबुद्धी आणि राजा प्रजेच्या धनावर डल्ला मारतील. हत्यार्‍याच्या हत्याच होतील. तसेच चोराची संपत्ती चोरच चोरुन नेईल.

कलियुगाचा अंत-

अंताच्या वेळेस भरपूर मोठे युद्ध होतील, जोराचा पाऊस,  वादळे, तापमान वाढेल. लोक एकमेकांच्या शेतातील पिके चोरुन नेतील. कपडे चोरतील! पाणी पिण्याचे सामान देखील चोरतील!  एवढेच काय एकमेकाच्या भाकरी सुद्धा पळवतील!  कलियुगाचा अंत वेदव्यास यांच्या म्हणण्यानुसार कलियुगाच्या अंताच्या वेळेस थोडेसे पाप कमी-कमी होत जाईल.

तर लोक परत हळूहळू साधू- पुरुषांची सेवा, पुण्य, प्राण्यांची रक्षा यामध्ये विश्वास ठेवू लागतील. सर्वश्रेष्ठ मार्ग काय आहे याचा शोध घेतल्यानंतर धर्मच सर्वश्रेष्ठ आहे हा विचार लोकांना पटेल!  अशाप्रकारे हळूहळू प्रजा धर्माच्या मार्गावर चालण्यास सुरुवात करेल. अशाप्रकारे  कलियुगाचा अंत होईल!

Leave a Reply