आय हेट यू डॅडी!!! दगडी चाळ २ चित्रपटामधील अंकुश चौधरीचा लूक पाहिलात का नाही…

0
499
I HATE YOU DADDY Why haven't you seen Ankush Chaudhary's look inDagadi Chawl 2 movie....

मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडे यांची दगडी चाळ २ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहे. अनेक दिवसांपासून दगडी चाळ २ हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेमध्ये आहे. या चित्रपटाचा पहिला भाग बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली आहे. त्यानंतर लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीचा लूक समोर आला आहे. चंद्रकांत कणसे दिग्दर्शित दगडी चाळ २ चित्रपट १८ ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे.

दगडी चाळ २ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये अरुण गवळी यांच्या लूकमधील मकरंद देशपांडेंना पाहून सर्वजण भारावून गेले आहेत. टीझरमुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता अधिकच वाढली आहे. दगडी चाळ मध्ये अंकुश सूर्याची भूमिका साकारणारा होती आणि ती अतिशय लोकप्रिय ठरली होती. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये अंकुशचा कोणती लूक पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांना खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.

दगडी चाळ २ च्या नवीन पोस्टरमध्ये अंकुश सूर्याच्या भूमिकेत दिसत आहे. चेहऱ्यावर प्रचंड राग आणि भेदक नजर असा अंकुशचा लूक यामध्ये पाहायला मिळत आहे. तसंच पोस्टरवरील आय हेट यू डॅडी ही ओळ खास लक्ष वेधून घेत आहेत. दगडी चाळ च्या पहिल्या भागात डोकं वापरून काम करणारा सूर्या अरुण गवळीचा उजवा हात बनला होता. परंतु यावेळस आय हेट यू डॅडी असे म्हणत सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत आहे. आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय? याचे उत्तर दगडी चाळ २ पाहिल्यावरच आपल्याला पहायला मिळणार आहे.

Leave a Reply