‘या’ दिवशीच झाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार याचा निर्णय!

0
401
It was decided on this day that Eknath Shinde will become the Chief Minister!

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात घडलेल्या धक्कादायक घडामोडीनंतर अखेर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे यांनी समर्थक आमदारांसह केलेल्या बंडानंतर कालपर्यंत देवेंद्र फडणवीस मंख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार, असा सर्वांचा अंदाज होता. दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी न सोपवता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याने आणि सरकारमध्ये सहभागी होणार नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास भाग पाडल्याने काल पासून त्याचीच चर्चा अधिक सुरु आहे.

Eknath Shinde
गुरुवारी दुपारी एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यपालांकडे जात सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि भाजपा त्यांना पाठिंबा देईल, अशी घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र आपण सरकारमध्ये आपण सहभागी होणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधत आणि ट्विट करत फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही असेच ट्विट केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणे फडणवीस यांना भाग पडले.

दरम्यान, दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली असली तरी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आधीच झाला होता, अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय हा दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले होते. तेव्हा हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच हे सर्व नियोजित कार्यक्रमानुसार घडले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
असं काही असेल असे वाटत नाही – दिपक केसरकर
शपथग्रहण सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याचे त्यांच्या चेहर्यावरुन आणि देहबोलीवरुन वाटत होते, असा टोला राष्ट्रवादी चे शरद पवार यांनी लगावला होता. मात्र असं काही नसेल, असे शिंदे गटामधील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. केसरकर पुढे म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. ते एवढे कुशल आहेत की, ते कुठल्याही पदावर काम करतील. देवेंद्र फडणवीस राज्यासाठी एका संपत्तीसारखे आहेत. जर ते त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी मंत्रालयात असतील तर तो एक चांगला निर्णय आहे, असे केसरकर म्हणाले.

Leave a Reply