टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

0
516
Jackie Shroff first reaction to Tiger and Disha patani breakup said

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी लवकरच एक व्हिलन रिटर्न्स या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर, तारा सुतारिया, जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. एकीकडे दिशाच्या या चित्रपटाची सोशल मीडयावर चर्चा आहे. व दुसरीकडे तिचं ब्रेकअप झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. दिशा पाटनी गेल्या काही वर्षांपासून अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत होती. तर दोघांनी त्यांच्या नात्यावर बोलणं नेहमीच टाळलं आहे. बॉलिवूडच्या अनेक कार्यक्रमात व पार्ट्यांत दोघंहीसोबत दिसले होते. आता या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत असताना. यावर टायगर श्रॉफचे वडील जॅकी श्रॉफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jackie Shrof

बॉम्बे टाइम्स शी बोलताना मुलाच्या ब्रेकअपच्या सुरु असणाऱ्या चर्चांवर बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र होते. आताही ते चांगले मित्र आहेत. मी त्यांना नेहमीच एकत्र मजा करताना आणि वेळ घालवताना पाहतो. मी माझ्या मुलाच्या लव्ह लाइफमध्ये मध्यस्थी करत नाही. त्यांची गोपनीयतेची चिंता करणं मला आवडत नाही. कामाशिवाय ते एकमेकांसाठी वेळ काढून फिरायला जातात असंही म्हटले.

जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले हे त्यांचं खासगी आयुष्य आहे व त्यामधील निर्णय ते दोघंही स्वतः घेऊ शकतात. त्यांना एकत्र राहायचं आहे की नाही हे त्या दोघांना ठरवायचं आहे. ते एकमेकांसाठी योग्य आहेत कि नाही हे त्यांनाच ठरवायचं आहे. ही त्यांची प्रेमकथा आहे. माझी व माझ्या पत्नीची वेगळी प्रेमकथा आहे. आमचे दिशासह चांगलं बॉन्डिंग आहे. आम्ही एकमेकांना भेटून आनंदी असतो अस देखील जॅकी श्रॉफनं म्हटले आहे.

Leave a Reply