मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री ऊर्मिला जगतापचा खडतर प्रवास जाणून घेऊया

0
596
Let's know the tough journey of actress Urmila Jagtap in Marathi film industry

“जय भवानी जय शिवाजी” या मालिकेत साकारलेल्या महाराणी सोयराबाईंच्या भूमिकेनं ऊर्मिला जगतापला ओळख मिळवून दिली. त्यापूर्वी देखील तिने बरेच गाण्यांमध्ये काम केले आहे आणि आपल्या चाहतावर्ग वाढवला आहे. ‘रौद्र’ या आगामी चित्रपटात ती काम करत आहे. कोन आहे उर्मिला काय आहे खरी कथा जाणून घेऊयात.

उर्मिला ही मूळची पुणे जिल्ह्यातल्या प्रसिद्ध जेजुरीजवळचं तक्रारवाडी हे तिचं गावात दिसते. घर शेतकरी, सिनेमासृष्टीत त्यांचा काही संबंध नाही. ‘हे क्षेत्र चांगलं नाही,’ असं तिच्या कानी वारंवार येत असाच परंतु इथं येण्याचं धाडस तिनं दाखवलं. क्षेत्रात येण्यासाठी तक्रारवाडीहून पुण्याच्या दिशेनं माझा प्रवास सुरू झाला. छत्रपती शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. सीए करावं अशी घरच्यांची इच्छा होती. तिनं तिच्या मेहनतीच्या जोरावर ऐतिहासिक मालिकेत काम मिळवलं. म्युझिक अल्बम, मालिका ते चित्रपट अभिनेत्री टीव्हीवर आल्याने घरच्या देखील पाठिंबा दिला. गावातील व नातेवाईकांकडून देखील तिला खूप प्रोत्साहन मिळाल्यामुळे तिने आपले काम अजूनच जोरदार सुरू केले.

ऊर्मिला म्हणाली, लहानपणापासूनच नृत्याचा छंद होता. लहानपणापासूनच या चित्रपट सृष्टीचे आकर्षण होते.आजी लहानपणी गावातील मुलं जमन महाभारत रामायण यांसारखी नाटकं बसवत असे मी त्यात अनेक वेळा अनेक पात्र देखील केली आहेत द्रौपदी त्यामुळे अभिनयाचा बराच अनुभव मला होता. कॉलेजमध्ये सांस्कृतिक उपक्रमांत सहभाग घेतला. नाटकांत काम करतेस, तर मालिकेसाठी प्रयत्न कर असं मैत्रिणीनं सुचवलं. आणि नृत्याचा दांडगा अनुभव होताच. आपल्यात काही कलागुण असले, तरी आपण इंडस्ट्रीबाहेरचे असल्यानं आपल्याला त्याची जाणीव असते असं नाही. माझ्या प्रवासात आजीच खूप मोठा वाटा असल्याचे तीने सांगितले आहे.

 

इतर अभिनेत्रींना प्रमाणे मी देखील या क्षेत्रात पावले टाकण्यास सुरुवात केली मग ऑडिशन देणार त्यासाठी लागणारी मेहनत संघर्ष सुरू झाला.संघर्ष प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाला असतोच. प्रयत्नात सातत्य हवं. पुण्यात आल्यानं मुंबईला जाणं सोपं होईल आणि अभ्यास करता करता पटकन मुंबईला जाऊन ऑडिशन देता येतील असं माझ्या मनात होतं. प्रत्यक्षात ते सोपं नाही, हे इथं आल्यावर कळलं. पुण्याहूम मुंबईत आल्यावर मात्र माझा प्रत्येक दिवस मी यासाठीच वाहिला आहे. माझ्यासाठी संघर्ष ही या क्षेत्रातले बारकावे शिकण्याची प्रक्रिया ठरली. इतर अनेकांप्रमाणे मी ही वडपाव खाऊन दिवस काढले आहेत. आपल्याला जे मिळवायचं आहे त्यातल्या या पायऱ्या आहेत. चांगलं दिसणं , सुंदर रूप आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी तुमच्यात असणं गरजेचं आहे. याचं कारण अनेकदा दिसण्यावरून तुमच्यात एखादी नायिका लेखक-दिग्दर्शकाला सापडते. दिसण्यासह गुणवत्ता असली, तर तुमचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.

Leave a Reply