थंडीच्या काळात नखाच्या बाजूचे कातडे निघतात का? जाणून घ्या यावरचे सोपे घरगुती उपाय…!

0
711
nail-skin-peeling-nakh-skin-twacha-nighane-marathi

हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी व रुक्ष व्हायला सुरुवात होते. हिवाळ्यामध्ये त्वचेमध्ये मॉईश्चर राहत नाही. त्यामुळे त्वचा कोरडी होत जाते व तिला चरे किंवा चिरा पडतात. नखाच्या वरती त्वचेचे पातळ आवरण किंवा पापुद्रा असतो त्याला क्युटिकल्स असे म्हणतात. वातावरणातील बदलामुळे व थंडीमुळे हे क्युटिकल्स खराब होत असतात. कधी-कधी हे क्युटिकल्स दुखरे देखील होतात. त्यामुळे त्वचेला चरे पडतात व त्वचा फाटते. अशावेळी ही त्वचा काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यास हाताला दुखापत होते.

आपण बरेचदा अनुभव घेतला असेल की आपल्या नखांच्या वर असलेली त्वचा ही हिवाळ्यामध्ये तुटलेली दिसते. त्यामुळे आपल्या बोटांचे सौंदर्य तर खराब होतेच शिवाय कधीकधी ती त्वच्या आपण काढायला गेलो तर त्यामुळे दुखापत देखील होऊ शकते. ही त्वचा नैसर्गिक रित्या डॅमेज होत असते. याकरता स्किनकेअर म्हणुन  काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे ही त्वचा काढून टाकता येते किंवा आपोआप बरी करता येते.

आज या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला नखाच्या वर खराब होणाऱ्या त्वचेला चांगले करण्यासाठी उपाय सांगणार आहोत. नखाच्या वर असलेली त्वचा फाटली असल्यास तिला कधीही अोढू किंवा कापू नये, त्यामुळे जिव्हाळी लागते व कधी-कधी रक्तही येते आणि अनेक दिवस आपलेच बोट दुखायला लागते.

व्हॅसलीन किंवा पेट्रोलियम जेली जर नखाच्या वर त्वचेवर लावावे.  रोज सात-आठ दिवस असे केल्यास नखाच्या वरील त्वचा मुलायम होऊन पहिल्यासारखी दिसु लागते. नखाच्या वरील फाटलेल्या त्वचे करता आपण अॅलोवेरा जेल देखील वापरू शकता.  अॅलोवेरा जेल आठ दिवस रोज नखाच्या वरच्या त्वचेवर लावून ठेवल्यास चमत्कारिक रित्या त्वचेचे चिरा ठीक होतात.

त्वचा कोरडी आणि कडक होत असेल तर अशा वेळी दिवसातून रोज पंधरा मिनिट कोमट पाण्यामध्ये हात बुडवून बसावे. त्यामुळे आपले हात नरम व मऊ होतात.

मधाचा उपयोग केवळ  खाण्याकरताच नसतो तर त्वचेककरता देखील होतो. मध त्वचेकरता उपयोगी असते. जर तुम्ही नखाच्या वरच्या त्वचेला मध लावले, तरी देखील तुम्हाला फाटलेल्या व तुटलेल्या नखाच्या त्वचेची समस्या दूर होताना दिसेल.

रोज रात्री झोपण्यापूर्वी नखाच्या वरच्या त्वचेवर ऑलिव्ह ऑईलचा मसाज केला, तरीसुद्धा नखाच्या वरील तुटलेले स्किन चांगली होण्यास सुरुवात होते. अॉलिव्ह अॉईलचा मसाज केल्याने त्वचा नरम, मुलायम होते. तसेच त्वचेचे डेड स्किन पापुद्रे आपोआप निघुन जातात.

ओट्स आणि गरम पाणी एकत्र करून नखाच्या त्वचेवर लावल्यास नखाच्या वरील खराब झालेली त्वचा चांगली होते. हे होते नखावरील डेडस्किन काढण्याचे काही घरगुती उपाय, आपण देखील या उपायांद्वारे या समस्येपासुन सुटका मिळवु शकता.

Leave a Reply