भात की चपाती? जाणून घ्या आरोग्याकरता चांगले काय?

0
716
rice-fir-weight-loss-chapati-wheat-fat-percentage-good-health-benifit-bad-in-marathi-trends

आपल्या भारतीय जेवनामध्ये भात व चपाती या दोन्हीना ही एक सारखेच महत्त्व आहे. प्रत्येक जेवनामध्ये भात आणि चपाती खाल्ली जाते. भारतीय जेवणामध्ये कोणताही पदार्थ असला तरी भात व चपातीसोबतच तो खाल्ला जातो. अनेक वर्षांपासून लोक चपाती श्रेष्ठ की भात श्रेष्ठ? अशा प्रकारच्या द्वंद्व आपण ऐकले असेल. तसेच याबाबत अनेक ठिकाणी वादविवादाच्या गोष्टी घडतात कि यांच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण?

काही लोकांच्या म्हणण्यानुसार, भात खाल्ल्यामुळे लठ्ठपणा वाढतो तर काही लोकांचे म्हणणे असते की चपाती पचण्यासाठी जास्त वेळ लागतो. आता प्रश्न असा पडतो की, कोणाचे, कोणते म्हणणे सत्य मानावे? व कोणते असत्य?  जर आपणही या बाबतीत कन्फ्युज झाला असाल की चपाती श्रेष्ठ की भात श्रेष्ठ? तर आज आम्ही आपले हे कन्फ्युजन दूर करणार आहोत!

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे माहिती सांगणार आहोत की काय खावे चपाती की भात? 
चपातीमध्ये असते जास्त सोडियम-
भात आणि चपातीमध्ये जास्त अंतर नाही. दोन्हींचीही कॅलरी व्हॅल्यू आणि पोषणतत्व जवळजवळ एक सारखेच असतात. भात आणि चपातील पोषणतत्वांची मात्रा पाहायला गेली तर फक्त चपातीमध्ये सोडियमच्या प्रमाणामध्ये फरक असतो.

भाताच्या तुलनेमध्ये चपातीमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. 120 ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये 190 मिलिग्रॅम सोडिअम असते. तर भातामध्ये सोडियम जवळजवळ नसतोच! डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याला असे आजारपण असेल ज्यामध्ये आपल्याला सोडियम घेण्यास मनाई केले आहे, तेव्हा आपण चपातीऐवजी भात खाल्ला पाहिजे!

वजन कमी करण्यासाठी चपाती फायदेशीर-
भाताच्या तुलनेत चपातीमध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. चपाती खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळपर्यंत भरलेले राहते, जे लोक वजन कमी करण्याचे प्रयत्नात असतात त्यांना चपाती खाण्याचा सल्ला दिला जातो.

भात लवकर पचतो, चपाती पचण्यास जास्त वेळ लागतो! तसेच चपातीमुळे रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित राहते. भातामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असतो, त्यामुळे भात पचायला सोपा असतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांचे पोट ठीक नसते त्यांनी भात खाणे ठीक असते.

चपाती मध्ये असतात जास्त पौष्टिक तत्व-
भाताशी तुलना करता चपातीमध्ये जास्त पौष्टिक तत्व असतात. चपातीमध्ये पोटॅशियम, आयर्न, कॅल्शिअम आणि फॉस्फरस अधिक प्रमाणात असतात. भातामध्ये कॅल्शियम नसते. तसेच पोटेशियम आणि फॉस्फरस देखील चपातीच्या तुलनेमध्ये भातामध्ये कमीच असतात. मात्र भातामध्ये चपातीच्या तुलनेत फोलेट आणि विटामिन बी अधिक प्रमाणात असते.
आरोग्य करता दोन्ही आहेत आवश्यक-
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रोजच्या आहारामध्ये भात आणि चपाती दोन्हीही आवश्यक असतात व दोन्ही आरोग्याकरिता चांगले असतात. तसे पाहिले तर भातापेक्षा चपातीमध्ये पोषणतत्त्व अधिक प्रमाणात असतात. भात खाल्ल्यामुळे ब्लड शुगर जास्त प्रमाणात वाढते.

चपातीमुळे असे होत नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे आहे, त्यांनी भाताऐवजी चपाती खावी. चपाती खाणे जास्त योग्य राहील. चपाती खाल्ल्याने पोट जास्त काळपर्यंत भरलेले राहते आणि भूकही कमी लागते, ज्यामुळे वेटलॉस करण्यासाठी त्याची मदत होते. मात्र ज्या लोकांना पचनसंस्थेसंबंधी समस्या आहेत त्या लोकांना चपातीऐवजी भात खाण्याचा सल्ला दिला जातो!

Users who found this page were searching for:

    जास्त चपाती खाल्ल्याने काय होते?,

Leave a Reply