सोयाबीनच्या सेवनाने होईल खूप फायदा…! मिळेल अनेक आजारापासून कायमची सुटका, जाणून घ्या काय आहेत चमत्कारिक फायदे…!

0
554
soyabenn health benifit marathi effects protens

आपण रोजच्या जेवनामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करत असतो. आपण जसे अन्न खातो तसा आपल्या शरीराच्या संपूर्ण अवयांवर त्याचा प्रभाव होत असतो. ‘जसे माणसांना खातो तसे माणूस घडत असतो’ अशी उक्ती ही प्रसिद्ध आहे. तिखट, गोड, खारट, तुरट, आंबट यासारख्या चवी माणसाला प्रिय आहेत. मात्र काही पदार्थांच्या अतिसेवनामुळे आपल्याला मोठमोठ्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

ठराविक वयानंतर आपल्याला काही पदार्थ खाण्यावर पथ्य पाळावे लागते. वाढत्या वयाबरोबर हाडे ठिसूळ होतात तसेच शरीरांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण देखील खाली-वर होत असते. सकस आहार घेतल्यामुळे शरीराला पोषक तत्त्वे मिळत असतात. दैनंदिन कामांमध्ये ऊर्जा मिळण्याकरता आपल्याला योग्य सकस व पोषक आहाराची आवश्यकता असते.

पण बरेचसे पदार्थ असतात ज्याबद्दल आपल्याला माहिती सुद्धा नसते की सहजपणे मिळणारे हे काही पदार्थ आहारात समावेश केल्यामुळे अनेक मोठ्या आजारांपासून आपले संरक्षण होत असते. आहारामध्ये सोयाबीनचा समावेश केल्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून मानवी शरीराचे संरक्षण होत असते. सोयाबीनमध्ये मोठ्याप्रमाणावर प्रोटीन असते.

अंडी, दूध, मांस यापेक्षाही जास्त प्रोटीनची मात्रा सोयाबीनमध्ये असते. त्याबरोबरच सोयाबीन मध्ये विटामीन बी कॉम्प्लेक्स, विटामिन, मिनरल्स आणि अमायनो ऍसिड सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात.ज्यामुळे शरीराच्या विविध गरजा भागवण्यासाठी व रोगांवर उपचार करण्यासाठी फायदा होत असतो.

सोयाबीनमधील विशेष गोष्ट म्हणजे सोयाबीन मुळे शारीरिक विकास, त्वचारोग आणि केसांच्या समस्यांवर देखील उपचार केले जातात. आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला सोयाबीनचा रोजच्या आहारात समावेश केल्यामुळे होणाऱ्या फायद्यांबाबत माहिती देणार आहोत.

कॅन्सर सेल्स रोखण्यासाठी

सोयाबीनचा नित्य आहारामध्ये समावेश केल्यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून देखील बचाव होतो. सोयाबीन मध्ये असलेले अँटी-ऑक्सीडेंट सर्व प्रकारच्या कॅन्सरला रोखण्यासाठी मदत करतात. शरीरात निर्माण होणाऱ्या कॅन्सर पेशींना तयार होण्यापासून किंवा वाढण्यापासून सोयाबीनमधील अँटी- अॉक्सीडेंट रोखतात.

सोयाबीन मध्ये असलेले फायबर कन्टेन्ट कोलोन कॅन्सरचा धोका देखील कमी करतात. यामुळे डॉक्टर सुद्धा सोयाबीन खाण्याचे सल्ला देतात.

मानसिक रोगांमध्ये उपयोग

जर एखादा व्यक्ती मानसिक आजाराने ग्रासलेली असेल, तर अशा व्यक्तीच्या रोजच्या आहारामध्ये सोयाबीनचा समावेश केला पाहिजे. मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी सोयाबीन मदत करते. सोयाबीन खाल्ल्यामुळे मेंदू देखील कार्यक्षम राहतो.

हृदयरोगाध्ये फायदा

जर आपल्याला उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असाल तर आपण रोज सोयाबीन आहारात समाविष्ट केले पाहिजे. सोयाबीन ब्लडप्रेशरला नियंत्रणात ठेवण्यामध्ये उपयोगी असते. ह्रदयरोग्यांना सोयाबीन खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जर आपण पहिल्यापासूनच आपल्या आहारात सोयाबीन खात असाल तर आपल्याला हृदयरोगाचा सारखे आजार होत देखील नाहीत.

मजबूत हाडांसाठी सोयाबीन मध्ये असलेल्या विटामिन आणि मिनरल्समुळे तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर, सेलेनियम आणि झिंक जास्त प्रमाणात मिळत असल्यामुळे शरीराला पोषण मिळते व हाडे देखील मजबूत होतात. नियमित सोयाबीनचे सेवन करणाऱ्या लोकांचा ऑस्टियोपोरोसिससारख्या  समस्यांपासून बचाव होतो.

मधुमेहावर उपयुक्त

शर्करायुक्त खाद्य पदार्थांमुळे मधुमेहाची समस्या वाढते. लो ग्लाइसेमिक इंडेक्स फूड असल्यामुळे त्यामध्ये कॉर्बोहायड्रेट आणि चरबी कमी मात्रा मध्ये असते. त्यामुळे मधुमेहामध्ये सोयाबीनचे सेवन रोज करणे लाभदायक ठरते. सोयाबीन मध्ये आढळणारा प्रोटीन ग्लुकोजला नियंत्रित करतो व इन्सुलिनमध्ये येणारी बाधा देखील कमी करतो.

Leave a Reply