“भाग्य दिले तू मला” या मालिकेमधील काकू बोक्याची जोडी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा

0
479
There are talks about Kaku Bokya pair dating each other from the serial Bhagya Dike Tu Mala

भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मालिकेतील राज आणि कावेरी हि जोडी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. हे दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडतील याची प्रेक्षक वाट पाहत आहे. राज आणि कावेरी एकमेकांना काकू व बोका या नावाने हाक मारतात. कावेरी काकूबाई प्रमाणे साडी नेसून ऑफिसमध्ये येत असल्याने राज वर्धनने तिला हे नाव दिले आहे. तर कावेरी राजला बोका म्हणते, त्यानंतर काकू बोक्याची जोडी मालिकेत सुपरहिट झालेली दिसली आहे.

https://www.secure.instagram.com/reel/CgUJfvwJ7vr/?utm_source=ig_web_copy_link

तन्वी मुंडले व विवेक सांगळे यांनी या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारली आहे. या दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. विवेक सांगळे याने काही मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. व तन्वीची प्रमुख भूमिका असलेली ही दुसरी मालिका आहे. झी मराठीवरील पाहिले न मी तुला या मालिकेमधून तन्वीने छोट्या पडद्यावर नायिका म्हणून प्रथम प्रवेश केला होते. मालिके एकत्रित काम करत असताना दोघांची मनं जुळलेली पाहायला मिळत आहे.

तन्वी व विवेक ये दोघेही प्रमुख कलाकार मालिका व्यतिरिक्त सोशल मीडियावर रिल्स बनवत असून रिल्सची सुरुवात चॅनलकडूनच झाली. परंतु या दोघांचे रील्स प्रेक्षकांना खूप आवडू लागले आहेत. अगदी मराठी सृष्टीतील सेलिब्रिटी देखील कमेंट्स व लाईक्सचा वर्षव होत आहे. काहींनी दोघांना लग्न करण्याचा सल्ला सुध्दा दिला आहे. विवेकला तर मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी स्वतः फोन करून तुम्ही दोघे एकमेकांना डेट करता का? असे प्रश्न विचारु लागले आहेत. परंतु हे फक्त मालिकेपुरते मर्यादित असल्याचे या दोघांनी देखील स्पष्ट केले आहे.

मालिकेच्या स्क्रिप्टमध्ये जर कावेरी व राज यांचे भांडण होणार असेल तर ते तेवढंच लिहून येतं. पुढे भांडण कसं रंगवायचं ही जबाबदारी या दोघांवरच सोपवली जाते. त्यामुळे मालिकेत अजून पुढे या दोघांची भांडणं अशीच पाहायला मिळावीत अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. त्यामुळे भाग्य दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांची अधिक पसंतीस काबील ठरत आहे.

Leave a Reply