जाणून घ्या कोणती आहे ती डाळ आणि काय आहे फायदे! प्रत्येकाच्या किचन मध्ये उपलब्ध असते ही डाळ…!

0
691
urad-dal-udid-dal-Black-lentils-Black-gram-health-benifit-in-marathi-side-effects-fats-ayuvedic-daal

आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते ही डाळ!!

आहार -शास्त्रानुसार प्रथिनांचे प्रमुख स्त्रोत असलेले पदार्थ म्हणजे आपल्या रोजच्या वापरातील डाळी होय! डाळींमुळे भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते. सर्व डाळींमध्ये सगळ्यात चविष्ट असलेली डाळ म्हणजे उडदाची डाळ! सालासकट असलेली काळी उडदाची डाळ चवीला अतिशय रुचकर व स्वादिष्ट असते. ज्यामुळे उडदाची डाळ सगळ्यांनाच खायला आवडते!

उन्हाळा आला की आपण उडदाच्या डाळीपासून पीठ बनवून केलेले उडदाचे पापड बनवत असतो . वाळवणीच्या पदार्थांमधील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे उडदाचे पापड! वर्षभर आपण हे पापड आपल्या जेवनासोबत तळून किंवा भाजून खातो. त्यामुळे जेवणाची चव वाढते. उडदाच्या अौषधी गुणांमुळे उडदाच्या डाळीचा आपल्या आहारामध्ये अगदी प्राचीन काळापासून समावेश केला आहे

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे उडदाची डाळ खाण्याचे आरोग्यवर्धक महत्व, उपयोग व फायदे सांगणार आहोत! स्वयंपाकामध्ये उडदाची डाळ बनवून केलेली आमटी व वरण सगळ्यांचेच आवडते आहे. आपल्या वेगळ्या फ्लेवरमुळे व चवीमुळे उडदाची डाळ ही प्रत्येक खाणाऱ्या शौकिनाची आवडती डाळ मानली जाते.

प्रत्येकाच्या घरात उडीद डाळ आठवड्यातुन एकदा बनवलीच जाते. उडदाची डाळ बर्‍याच आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते. आयुर्वेदामध्ये उडदाच्या डाळीला ‘माशा’ असे म्हटले जाते. उडदाच्या डाळीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स, विटामिन बी, आयर्न, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये आढळते.

गरोदर महिलांकरता उडदाची डाळ म्हणजे एक प्रकारचे आरोग्यकवच म्हणायला हवे! उडदाच्या डाळीमध्ये उच्च प्रतीचे फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे हृदयाच्या संबंधित आजारांमध्ये उडदाची डाळ खाणे फायदेशीर असते.

उडदाची डाळ ह्रदयाचे आरोग्य सुधारते. तसेच उडदाची डाळ हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. उडदाची डाळ आयर्न तसेच लाल रक्त पेशींना बनण्यासाठी मदत करते. लाल रक्तपेशींमुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचत असतो. तांबड्या रक्त पेशी अॉक्सिजनचे वहन करतात.

उडदाची डाळ हाडांमधील मिनरल डेन्सिटी चांगली करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. नियमित उडदाच्या डाळीचे सेवन केल्यामुळे हाडांसंबंधी आजारांमध्ये आराम मिळतो. तसेच हाडांचे आरोग्य चांगले राहते. उडदाची डाळ आपल्या चेतासंस्थेकरता चांगली असते. आपल्या मेंदूच्या आरोग्याकरता व विकासाकरता उडदाची डाळ खाणे चांगले मानले जाते. उडदाची डाळ खाल्ल्यामुळे मानसिक तणाव देखील कमी होतो.

उडदाच्या डाळीचे मध्ये भरपूर प्रमाणात शुगर आणि ग्लुकोज लेव्हल नियमित करणारे घटक असतात. उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे डायबिटीज रुग्णांसाठी शुगर लेव्हल व ग्लुकोज लेव्हल नॉर्मल करण्याकरता ही दाळ मदत करते.

m जर आपल्याला जखम झाली असेल किंवा आपल्याला मुका मार लागलेला असेल व ज्यामुळे आपल्या अंगावरती सूज आली असेल तर अशावेळी सुजेच्या ठिकाणी उडदाच्या डाळीची पेस्ट करुन लावावी. काही वेळ ही पेस्ट अशीच दुखर्‍या जागी लावून ठेवावी यामुळे दुखण्यामध्ये थोड्याच वेळात आराम मिळतो.  तर हे होते उडदाच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे!

Leave a Reply