शरीराच्या काही खास बिंदू ला दाबा, एवढे वजन कमी होईल, कधी विचारही केला नव्हता इतका फायदा होईल…!

0
662
weight loss marathi tips

चंगळवादी व धावपळीच्या जीवनशैलीमुळे आज-काल वाढते वजन हा गंभीर विषय बनत चालला आहे. वजन कमी करण्याकरता लोक खूप प्रयत्न करत असतात. व्यायामासोबतच आहारावर देखील नियंत्रण करतात. अगदी उपाशी राहून देखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. लोक बरेच आवडीचे पदार्थ खाण्याचे बंद करतात, तसेच कॅलरी बर्न करण्याकरता अक्षरशा तासन् तास जिम, योगासने, सूर्यनमस्कार देखील करतात!

पण वाढत्या वयाबरोबर वजन कमी करणे वाटते तितके सहज आणि सोपे नसते. अथक परिश्रम घेतल्यावरच वजन कमी होते. योग्य फिटनेस मार्गदर्शन व आहारतज्ञ यांच्या सल्ल्यानुसार सेलिब्रिटीज लोक वजन मेन्टेन ठेवत असतात.

सेलिब्रिटीज लोक आपला फिटनेस जपण्याकरता लाखो रुपये खर्च करत असतात. पण सामान्य माणसाला एवढे पैसे खर्च करणे शक्य नसते. त्यामुळे जो सांगेल त्या प्रत्येकाचे ऐकत वेगवेगळे प्रयोग स्वतःवर केले जातात. पण वजन मात्र कमी होतच नाही.शरीरावरील वाढती चरबी हा खूपच गंभीर प्रश्न आहे.

वाढत्या वजनासोबतच खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. वजनवाढीमुळे गंभीर आजारांना देखील लोक बळी पडत आहे. लठ्ठपणामुळे हार्ट अटॅक, डायबिटीस, लो-बी.पी, हाय बी-पी असे आजार मागे लागतात.

फास्ट फुड च्या युगामध्ये आपले वजन मेन्टेन राखण्याकरता लोक अनेक प्रकारच्या कसरती करत असतात. काही लोक रोज व्यायाम करतात, तर काही लोक जिम,  योगासना द्वारे देखील व्यायाम करून वजन संतुलित राखण्याचा प्रयत्न करत असतात.

मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच वजन मर्यादित व संतुलित ठेवण्याकरता आजकाल व्यायामाची अतिशय गरज पडते. बरेच लोक सकाळी उठून जॉगिंग,सायकलिंग करतात. तरी सुद्धा वजनाचा काटा हलतच नाही.

एवढे सगळे उपाय करूनही जर वजन कमी होत नसेल तर ॲक्युप्रेशर चा वापर करून नक्कीच वजन कमी करता येऊ शकते. मानवी शरीरांमध्ये असे काही बिंदू असतात ज्या बिंदूंना दोन बोटांनी, दोन मिनिट दाबून ठेवल्यावर आणि मालिश केल्यावर, पचनशक्ती सुधारते आणि पोटातील गॅस एसिडिटी समस्या दूर होतात आणि वजन घटते.

तर जाणून घेऊया कोणते आहेत ते बिंदू ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते?

हाताच्या कोपरा जवळचा बिंदू-

हाताच्या कोपरा जवळच्या बिंदूला दाबले तर शरीराचे तापमान नियंत्रित राहते तसेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील मदत होते. रोज एक मिनिट नियमितपणे हा बिंदू दाबला तर शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीरामध्ये जमा होणारे अधिकचे पाणी बाहेर निघण्यास देखील मदत होते.

नाक आणि ओठ यामधील बिंदू-

आपल्या नाक आणि ओठांच्या मध्ये एक बिंदू असतो, तो दाबल्यामुळे व्यक्तीला तणावापासून आराम मिळतो. तसेच लठ्ठपणाच्या समस्या देखील दूर होतात. या बिंदूला दाबल्यामुळे तणाव निर्माण करणारे हार्मोन्स संतुलित राहतात.

कानाच्या आतील बिंदू-

कानाच्या आत असलेल्या बिंदूला ॲक्युप्रेशर मधे केंद्रबिंदू म्हटले जाते. हा बिंदू आपल्या बोटाच्या साहाय्याने एक ते दोन मिनिटे दाबून ठेवल्यास वाढते वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. हा बिंदू दाबल्यामुळे व्यक्तीला लागणार्‍या अमर्याद भूकेवर नियंत्रण राहते.

Leave a Reply