धोनीने आत्ताच निवृत्तीचा निर्णय का घेतला? सांगतायत सुनील गावस्कर.

0
650
why dhoni announced retirement sujil gavaskar

भारताला जागतिक मंचावर वेगळ्या स्थानावर नेणार्‍या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी 15 ऑगस्ट रोजी आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. यासह गेल्या एक वर्षापासून त्याच्या सेवानिवृत्तीबाबत सुरू असलेली अटकळही संपुष्टात आली. कर्णधार म्हणून धोनीने 2007 मध्ये भारताला टी -20 विश्वचषक, 2011 मध्ये क्रिकेट विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दिली. धोनीच्या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित आहेत. यावर भारताचा माजी कर्णधार आणि सलामीवीर सुनील गावस्कर यांनी शेवटी धोनीनेच हा निर्णय घेतल्याचे कारण सांगितले.

इंडिया टुडेशी बोलताना गावस्कर म्हणाले की, आयपीएलमध्ये धोनी कशी कामगिरी हे त्याला स्वतःला जाणून घ्यायचे होते. त्यानंतरच त्याने टी -२० विश्वचषकात खेळायचे कि नाही हे ठरवले असते. पण आयपीएल कोरोना विषाणूमुळे पुढे ढकलले गेल्याने आणि टी -२० वर्ल्ड २०२२ पर्यंत पुढे ढकलला गेला, त्यामुळेच २-३ वर्ष वाट बघण्यापेक्षाआत्ताच निवृत्ती घेण्याचा निर्णय धोनीने घेतला असणार. जर विश्वचषक या वर्षीच झाला असता तर धोनी त्यात नक्कीच खेळाला असता.

टी -20 वर्ल्ड कप यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार होता पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे आता 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. आयसीसीने जाहीर केले की २०२१ मध्ये होणारा टी २० वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात तर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होईल. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना विषाणूमुळे टी -20 वर्ल्ड कप पुढे ढकलल्याने आयपीएलचा मार्ग मोकळा झाला आहे. युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत हे आयोजन केले जाईल. एमएस धोनी या काळात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून काम करताना दिसणार आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने हे विजेतेपद तीन वेळा जिंकले आहे.

Leave a Reply