बॉलिवुड अभिनेत्री आणि मॉडेल सारखी फिगर पाहिजे का? फॉलो करा या टिप्स…!

0
789
maintain-figure-fitness-secret
maintain-figure-fitness-secret

आज-काल सुंदर व सु-डोल शरीर असणे हा व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. आपले शरीर सुंदर सुडौल व व्यवस्थित आकारांमध्ये असेल तर आपल्याला इतर लोकांशी बोलताना व संभाषण करताना आत्मविश्वास वाढतो. तसेच आपल्याशी बोलताना देखील समोरच्या व्यक्ती प्रभावित होत असतात. चांगली पर्सनालिटी, चांगले व्यक्तिमत्त्व असणाऱ्यांकरता स्वस्थ शरीर असावे लागते.

आज-काल सेलिब्रिटीज आणि बॉलीवूड स्टार्स आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूपच जागृक असतात. फिटनेस जपण्याकरता तासनतास जिममध्ये घाम गाळतात, योगासने करतात. बॉलीवूड सेलिब्रिटीजची झिरो फिगर कोणालाही आकर्षित करते. आपल्या झिरो फिगर मुळे बॉलिवूड सेलिब्रिटीज अतिशय आकर्षक आणि सुडौल दिसतात.

आपल्यापैकी अनेक मुलींना असे वाटते की, आपणही बॉलीवुड हिरोइन्स आणि सेलिब्रिटी सारखे स्लिम ट्रिम झिरो फिगर दिसावे. मात्र झिरो फिगरकरता जे हेल्थ डायेट वर्कआऊट करायचे असते, त्याबद्दल कोणालाही माहिती नसते. सेलिब्रिटी सारखी झिरो फिगर मिळण्याकरता काही खाण्यापिण्याच्या बाबतीत काही  सवयी लावाव्या लागतात. तसेच संतुलित आहार घ्यावा लागतो. ज्यामुळे आपल्या शरीरांमध्ये एक्स्ट्रा फॅट जमा होत नाही व शरीर फिट व हेल्दी राहते.

बॉलीवूड सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्डच्या मॉडेल ज्या ट्रिक व टिप्स आणि डायट फॉलो करत असतात, आज आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि फॅशन मॉडेल यांचे हेल्थ रुटीन सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण देखील झिरो फिगर चे आपले स्वप्न साकार करू शकाल.

  1. ज्या व्यक्तींना खूपच लठ्ठपणा आहे व खाण्याची खूप हौस आहे, त्यांनी सर्वप्रथम आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच नियमित व्यायाम करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे लागेल.
  2. रोज सकाळी उठल्यावर गरम पाण्यासोबत लिंबू आणि मध टाकून प्यायल्यास आपल्या पोटाचे आरोग्य सुधारते पचनक्षमता कार्यक्षम होते व डायजेशन चांगले होते. पोटातील विषारी पदार्थ व चरबी कमी होण्यासाठी गरम पाणी मध व लिंबू हे उपायकारक आहेत.
  3. रोज सकाळी न्याहारी मध्ये अंकुरित धान्य खाल्ले पाहिजे. मटकी, मठ, चवळी, राजमा या कडधान्यांच्या उसळी खाल्ल्या पाहिजेत.
  4. रोज दुपारच्या जेवनामध्ये सलाड आणि दह्याचा समावेश केला पाहिजे, त्यामुळे जेवण पचण्यास सुलभ होते.
  5. चहा प्यायचा पूर्णपणे बंद केला पाहिजे.
  6. रात्रीच्या जेवणात अतिशय कमी आहार घेतला पाहिजे किंवा खूप हलका आहार घेतला पाहिजे. जर तुम्हाला शक्य असेल तर रात्री सलाड खाऊन तुम्ही झोपू शकता.
  7. दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी प्यायला पाहिजे.

तर हे होते हीरोइन आणि फॅशन वर्ल्ड मॉडेल्सच्या झिरो फिगर मेंटेन ठेवण्याकरताचे उपाय व टिप्स.
या टीप्‍स तुम्ही रेगुलर फॉलो केल्या तर तुम्हाला देखील हिरॉईन आणि मॉडेल सारखी झिरो फिगर मिळणे शक्य होईल.

Leave a Reply