‘झोंबिवली’ चित्रपटाचे शूटींग डोंबिवलीत का झाले नाही? दिग्दर्शकानी सांगितले कारण

0
565
Why was Zombivali not shot in Dombivali Because the director said

‘झोंबिवली’ हा या संकल्पनेवर आधारीत मराठीतील पहिला हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. मराठीत पहिल्यांदाच ‘झोम्बी’वर आधारित चित्रपट येत असून त्याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेलं आहे.या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहेच तसेच काहीसा हॉरर आणि तितकाच धमाल उडवून देणारा ‘झोंबिवली’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटामधील काही सीन भीतीदायक वाटतात, तर काही संवाद मात्र हसायला भाग पाडतात.

त्यानंतर अनेक डोंबिवलीकरांनी हा चित्रपट डोंबिवलीत कुठे शूट केला? असा प्रश्न उपस्थित केला.चित्रजटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार त्यांनी या चित्रपटाचे शूटींग डोंबिवलीत का करता आले नाही हे देखील सांगीतले.ते म्हणाले की, हा चित्रपट करण्याचा विचारच त्या नावावरुन आला होता. झोम्बी फिल्म करायची हे सर्व मान्य आहे. पण काय कोणती करायची, मराठी कशी करावी? जेव्हा सुचलं तेव्हा डोंबिवलीत जर झोम्बी आले आणि त्या चित्रपटाचे नाव जर झोंबिवली असेल तर कसे वाटेल. त्यामुळे हा चित्रपट टायटलवरुन सुचला.

पहिलं टीझर पोस्टर काढल्यानंतर मला अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांचे फोन आले. तुम्ही हे नाव दिलं, तर डोंबिवलीचं नाव खराब होईल. लोक आता डोंबिवलीला झोंबिवली म्हणून ओळखायला लागतील, असे अनेक धमकीवजा सूचना मला देण्यात आल्या. पण हा कॉमेडी चित्रपट आहे. त्यामुळे त्याला किती सिरीयस घ्यायचे हे तुम्हीच ठरवा. जर लोकांना नाही आवडलं तर लोक सांगतील. जर तुम्ही या चित्रपटाचे नाव हेच ठेवणार असाल तर आम्ही तो चित्रपट या ठिकाणी लागू देणार नाही किंवा पोस्टर फाडू वैगरे, अशीही धमकी मिळाली. आता शूटींग सुरु झालं यावर बोलणं फार लवकर होईल, असे मी अनेकांना वारंवार सांगितलं.

त्यानंतर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी हा चित्रपट डोंबिवलीत शूट झालाय का? असेही विचारले. पण केवळ या धमकीवजा फोनमुळे आम्हाला हा चित्रपट डोंबिवलीत शूट करता आला नाही, असेही आदित्य सरपोतदार यांनी म्हटले. याचे कारणच म्हणजे त्यावेळी तुम्ही डोंबिवलीत शूट करुन दाखवा वैगरे अशा धमक्या होत्या. एवढ्या सर्व टीमला घेऊन जाणार सेटवर काही तरी होईल यामुळे आम्ही लातूरमध्ये चित्रपट शूट केला. डोंबिवली ही लातूरमध्ये दाखवली. काही सीन निश्चित डोंबिवलीत शूट केले आहेत. पण मला संपूर्ण चित्रपट या ठिकाणी शूट करायचा होता. परंतु या कारणामुळे करता आला नाही, अशी खंत आदित्य सरपोतदार यांनी बोलून दाखवली.

Leave a Reply