marathitrends

हास्यकलाकार समीर चौघुले आठवणीत लतादीदींची पोस्ट शेअर करत झाले भावूक!

आज भारतरत्न, गानसामज्र लता मंगेशकर आपल्यामध्ये नाही आहेत. आज संपूर्ण जग या दुखवट्यात आहेत. बऱ्याच कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी लतादिदिंना श्रद्धांजली वाहिली. शिवाय काल रविवारी लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील.

लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे  आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अवघा देश दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला असता , हास्यकलाकार अभिनेता समीर चौघुलेने देखील लतादीदींना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.