‘आपणच घातलेला ड्रेस अडचणीत आणतो तेव्हा’, त्रस्त जाह्नवी कपूर ने शेअर केला स्वतःचा फोटो…!

0
839
janvhi kapoor pics latest news bollywood shredevi daughter

प्रत्येक व्यवसायाचे जसे काही फायदे असतात तसे तोटे ही असतात. ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण शो बिझिनेस मध्ये असलेल्या मंडळींना जास्त लागू पडते. त्यांच्या खाजगी आयुष्यातील नुकसान , त्यातले तोटे हे ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे’ हेच खरे.

सेलिब्रेटी म्हंटल कि मग कि मग इच्छा असो अथवा नसो, तुम्हाला विविध डिझायनर ड्रेस परिधान करणे हे आलेच. त्यातही मग ही डिझायनर मंडळी आपल्या सुपीक डोक्यातून स्टाईल च्या नावाखाली तुम्हाला काय घालायला भाग पाडतील हे काय सांगता येत नाही. असाच एक मजेशीर किस्सा नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूरच्या बाबतीत घडला आहे.

अभिनेत्री जाह्नवी कपूर सोशल मीडियावर फारच अ‍ॅक्टिव्ह असून तिचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलोवर्स आहेत. जे सतत तिच्या पोस्ट्स ची प्रतीक्षा करत असतात. जाह्नवी देखील तिच्या चाहत्यांना निराश करत नाही आणि वेळोवेळी त्यांच्यासाठी छायाचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करत रहाते.

आता अलीकडेच स्वतःचे एक चित्र शेअर करून, जाह्नवीने आपल्या जीवन शैलीची गुंतागुंत चाहत्यांशी शेअर केली आहे. वास्तविक, जाह्नवीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अशी दोन छायाचित्रे शेअर केली आहेत ज्यात तिने स्वतः वरच केलेला विनोद व तिची खिलाडू वृत्तीच जास्त समोर येते हे ही तितकंच खरं .

अडचणीत टाकणारा ड्रेस
पहिल्या फोटोत जाह्नवी लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसते. सोबत तिची हेअर स्टायलिस्ट तिच्या केसांची स्टाईल करताना दिसत असून सोबत जान्हवी काहीतरी खाताना दिसत आहे. यानंतर तिने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे ज्या मध्ये ती आणि तिची टीम ड्रेस परिधान करण्याचा आटापिटा करताना दिसत आहेत.

दुसर्‍या फोटोत जाह्नवीच्या हावभावावरून हा ड्रेस परिधान करण्यासाठी तिला किती संघर्ष करावा लागतो आहे हे आपण स्पष्टपणे पाहू शकतो . बिफोर आणि आफ्टर अश्या कॅप्शनसह जाह्नवीने ही दोन्ही छायाचित्रे शेअर केली आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाह्नवीने ही मजेदार छायाचित्रे शेअर करताच चाहत्यांनी ही तिला भरभरून प्रतिसाद व मनोरंजक टिप्पण्या देण्यास सुरवात केली.

शूटिंग न करताच जान्हवी पंजाबहून परतली
वास्तविक, जाह्नवी तिच्या पुढच्या चित्रपटाच्या ‘गुड लक जेरी’ चे शूटींग पूर्ण करण्यासाठी पंजाबमध्ये व्यस्त होती, पण शेतकरी आंदोलना मुळे शूट रद्द करण्यात आले आणि ती मुंबईत परतली आहे. कृषी कायद्या विरोधात चाललेल्या विरोध प्रदर्शना मुळे, आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी जान्हवी च्या चित्रपटाचे शूटिंग तिसऱ्यांदा थांबवले. ज्यामुळे जान्हवीला शूटिंग न करताच मुंबईत परत यावं लागलं.

Leave a Reply