तुझी माझी रेशीमगाठमध्ये यश-नेहाच्या लग्नात मोठा व्यत्यय; चॅनेलने मागितली माफी..

0
392
Major interruption in Yash-Nehas marriage in Mazhi Tuzhi Reshimgath The channel apologized

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिकेत आता यश आणि नेहाच्या लग्नाचा सोहळा होणार होता मात्र या ‘विवाह स्पेशल’ एपिसोड दरम्यान गडबड झाल्याने प्रेक्षकांची निराशा झाली आहे. नेहा कामत आणि यशवर्धन चौधरी १२ जून रोजी म्हणजे काल विवाहबंधनामध्ये अडकणे अपेक्षित होते. एपिसोड सुरु झाला मात्र काहीशा तांत्रिक गोंधळामुळे हा विवाह विशेष भागामध्ये व्यत्यय आला. याबाबत सोशल मीडियावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर लोकांनी विवाह सोहळ्याऐवजी जवळपास अर्धा तास जाहिरातच पाहिली, अशी तक्रार केली.

झी मराठी चॅनेलने मागितली माफी

झी मराठी’ वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘काही तांत्रिक अडचणींमुळे माझी तुझी रेशीमगाठच्या आजच्या विवाह विशेष भागात व्यत्यय आला. त्याबद्दल क्षमस्व. पण तुम्हा रसिकांसाठी हाच आनंद सोहळा आम्ही आज (१३ जून) रोजी सकाळी १०. वा. आणि दुपारी ४ वा. पुन्हा दाखवणार आहोत. त्यामुळे पाहायला विसरू नका. नेहा आणि यशच्या लग्नाचा आनंद सोहळा फक्त झी मराठीवर.’

झी मराठीकडून शेअर करण्यात आलेली ही पोस्ट या मालिकेतील कलाकारांनी देखील हि पोस्ट स्वतःच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे, मायरा वायकूळ, अभिनेता श्रेयस तळपदे यांचा समावेश आहे. ही मालिका लग्नविधींच्या एपिसोड्समुळे अधिकाधिक टीआरपी मिळवत होती सोशल मीडियावर या मालिकेचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान असा गोंधळ झाल्याने याचा फटका मालिकेच्या टीआरपी रेटिंगला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply