“तू बुधवार पेठेतील..” घृणास्पद कमेंट करणार्‍या युजरला मानसी नाईकची चपराक

0
651
manasi naik angry people using abusive language budhwarpeth

अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत असतात. बहुतेक वेळा त्यांना त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे टिकांचे धनी व्हावे लागते, त्या टिका ही ते आपण केलेल्या कामाचे कौतुक समजून गोड मानतात. पण हल्ली सोशल मिडिया युझर अनेक कलाकारांच्या फोटोवर किंवा त्यानी शेअर केलेल्या पोस्टवर अतिशय घृणास्पद पद्धतीने कमेंट करत असल्याचे पहायला मिळत आहे.

अशीच एक घटना घडली ”वाट बघतोय रिक्षावाला” फेम अभिनेत्री मानसी नाईकच्या बाबतीत. सध्या ती चित्रपट किंवा नृत्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांशी संवाद साधत असते. स्वतःच्या जीवनातील अनेक घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

हल्लीच एका सोशल मीडिया युजरने तिच्या पोस्टवर अत्यंत घृणास्पद कमेंट केली होती. मानसी नाईकने देखील लाईव्ह सेशनमध्ये या युजरची चांगलीच खरडपट्टी काढली.

युजरने केलेल्या ” तू बुधवार पेठेतील रां** आहेस ” या कमेंट्वर मानसी नाईकने तिचा संताप व्यक्त केला “ तुम्ही मला बुधावर पेठेत कधी बघितले ? त्याच्या पोटापाण्यासाठी त्या काम करतात. बुधावर पेठेत काम करणा-या महिला मोठ्या धाडसाने मेहनत करतात, त्यांचे घर चालवण्यासाठी त्या छातीठोकुन प्रामाणिकपणे काम करतात, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करुन दाखवा असे मानसीने कमेंट करणा-याला तिच्याच भाषेत चांगलेच धारेवर धरले.“ तसेच तिने बुधवार पेठेत काम करणा-या महिलांना देखील आदराने वागणुकीची गरज असल्याचे सांगितले.

काही महिन्यांपूर्वीच मानसीने बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. त्यावरून देखील तिला युझर्स नी मराठी मुलगा लग्नासाठी भेटला नाही का असे ट्रोल केले होते.

पण आता मानसी नाईकचे हे उत्तर ऐकून सर्व सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि अश्या कमेंट करणाऱ्या यूजर्सना हि एक चांगली चपराक बसली आहे म्हणायला काही हरकत नाही.

Leave a Reply