शिवरायांवरील चित्रपट हा माझा ड्रिम प्रोजेक्ट; पण समोर ‘या’सर्व आहेत अडचणी!

0
423

सध्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालतोय. अशावेळी, नागराज यांनी आपल्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपट हा माझा ड्रिम प्रोजेक्ट असून, निर्मिती करण्यात अडचणी का येत आहेत, याबद्दलचा मंजुळे यांनी एका मुलाखतीत केला आहे.

nagraj manjule jhund movie

दमदार चित्रपट देण्यासाठी ओळखले जाणारे नागराज मंजुळे हे शिवरायांच्या आयुष्यावरील चित्रपटावर काम करत आहेत. पण, हा चित्रपट सध्या आशेवर आहे. नागराज मंजुळे यांनी शिवरायांच्या आयुष्यावरील चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या टीझरमध्ये हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.

Nagraj Manjule

त्यावर ते म्हणाले, करोनाच्या साथीमुळे आम्हाला शूटींग करण्यास विलंब झाला. त्यात आम्हाला दोन वर्षे गमवावी लागली. ज्यामुळे आम्हाला नैसर्गिकरित्या या चित्रपटाचे काम करता आले नाही. पण हा चित्रपट रखडला असे म्हणता येणार नाही.

पुढे ते असही म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाची निर्मिती करणे हे आव्हानात्मक असेल. हा चित्रपट ऐतिहासिक आहे. जेव्हा तुम्ही विषय बदलतात तेव्हा अर्थातच चित्रपटाच्या स्वरुपात एक आव्हान समोर येतं असे नागराज मंजुळे म्हणाले.

Leave a Reply