या सुंदर अभिनेत्रीला ग्रासलंय गंभीर आजाराने; हिम्मतीये करतीये सामना

0
408
beautiful actress Bhagyashree Nhalve is suffering from a serious illness Courageous encounters

सोशल मीडियाच्या मध्यमातून अनेक कलाकार व्यक्त होतात. कधी प्रेमसंबंध असो तर नवी गाडी, घर खरेदी करणे असो या आनंदाच्या बातमीसोबतच आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, दुःखद घटनाबाबत ही कलाकार मंडळी लोकांना माहिती देताना दिसतात. फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे जी कविता नावाची भूमिका साकारत आहे. सध्या तिच्या आयुष्यात नवे वादळ आले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. भाग्यश्री न्हाळवे ही गेल्या काही दिवसांपासून एका गंभीर आजाराचा सामना करत आहे.

 

या आजारपणामुळे तिने काही काळ मालिकेतून ब्रेक घेतला होता. तिला एमआरआय काढल्यानंतर त्यात पेन्सोमनिया या आजाराचे निदान झाले होते. या आजारामुळे प्रचंड असह्य वेदना होतात त्यामुळे तिला रात्रीची झोप घेणं कठीण होत नाही. या आजाराशी ती गेल्या काही दिवसांपासून खंबीरपणे तोंड देत. पण याबाबत ती बाऊ न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी विरंगुळा शोधते. नुकतेच भाग्यश्रीने आपल्या कुटुंबासोबत एक छानशी ट्रिप एन्जॉय केली. या दुःखातून थोडासा विसर पडावा म्हणून मला इथे घेऊन आल्याबद्दल तिने आपल्या भावाला आणि वहिनीला पोस्ट च्या माध्यमातून धन्यवाद दिले आहेत.bhagyashree nhalve

 

दादा, माझ्या चेहऱ्यावरचं दुःख तुला पाहता येतं, मी भाग्यवान आहे मला तुमच्यासारखी माणसं भेटली. खूप धन्यवाद वहिनी आणि अर्णव, तुम्ही माझ्या पाठीचा कणा आहात. असे म्हणून भाग्यश्रीने त्यांचे आभार मानले आहेत. आपल्या दुखाचा क्षण विसरण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या या आजारपणाबद्दल कळल्यावर सहकलाकारांनी तसेच चाहत्यांनी भाग्यश्रीला काळजी घेण्यास सांगितले आहे. लवकरच या आजारातून पडशील अशीही आशा अनेकांनी व्यक्त केली आहे. भाग्यश्री न्हाळवे हिने मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुण्यातील सासवड येथे तिचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. जेव्हा शूटिंग नसते तेव्हा ती आपल्या गावी जाऊन राहते, असेही तिने सांगितलेbhagyashree nhalve marathi actress

Leave a Reply