अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने दिला बाळाला जन्म! घरात नवीन पाहुण्याचे आगमन!

0
777
nandita-vahini-saheb-dhanashree-kadgaonkar-zee-marathi-tuzyat-jeev-rangla-baby-boy-blessed-photos-news-latest

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने दिला बाळाला जन्म! घरात नवीन पाहुण्याचे आगमन! बेबी बॉय च्या आगमनाबद्दल सोशल मीडियावर केले शेअर!

झी मराठीची प्रसिद्ध मालिका ‘तुझ्यात जीव रंगला‘ या मालिकेतून व्हॅम म्हणजेच स्त्री व्हिलन रूपामध्ये दिसलेली नंदिता उर्फ ठसकेबाज वहिनीसाब म्हणजेच आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री आणि धनश्री काडगावकर!
या मालिकेतील तिने साकारलेली नंदिताची गावराण भूमिका खूपच गाजली. धनश्रीने साकारलेली नंदिता आजही घराघरात लोकप्रिय आहे.

धनश्रीने साकारलेली वहिनीसाब नंदिताच्या भूमिकेमुळे तिने हे सिद्ध करून दाखवले की एक कमी वयाची मुलगी देखील खूप चांगला व्हिलनचा अभिनय करू शकते. यापूर्वी इंडस्ट्रीमध्ये कधीही कमी वयाच्या मुलींना व्हिलनच्या रूपात दाखवण्यात आले नव्हते. मात्र धनश्रीने ज्या प्रकारे नंदिताची भूमिका निभावलेली आहे, ती पाहता आता अशा स्त्रीप्रधान व्हॅम्सच्या भूमिका नक्कीच भविष्यात पुढे इंडस्ट्री मध्ये वाढतील व पाहायला मिळतील, यात शंका नाही.

नंदिता वहिनीसाहेब म्हणजेच धनश्री काडगावकर हिने काही महिन्यापूर्वी आपण प्रेग्नेंट असल्याचा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर टाकला होता. धनश्री काडगावकर हिने दोन महिन्यापूर्वी तिच्या डोहाळ जेवणाचे व बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडिओ अगदी सुंदर व पारंपारिक प्रकारे बनवले होते.

धनश्रीचे गरोदरपणातील फोटो व व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेक लोकांनी तिच्या या गुड न्युजबद्दल कमेंट केल्या होत्या व तिला प्रेग्नेंसीसाठी व प्रसूतीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. या व्हिडिओमध्ये धनश्रीने अगदी पारंपारिक लुक मध्ये नऊवारी साडी परिधान करून झोपाळ्यावर बसुन आपल्या पतिसोबत व्हिडिओ शूट केले होते.

यामध्ये तिने प्रेग्नेंसीच्या लक्षणांना अगदी गोडपणे मांडले होते. तिला काय खायला खावेसे वाटत आहे, तसेच चिंच खातांना देखील तिने त्या व्हिडिओमध्ये दाखवले होते. धनश्रीचा तो प्रेग्नेंट असल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता. प्रेक्षकांच्या आवडीच्या असलेल्या या वहिनी साहेबांच्या भूमिकेतील अभिनेत्रीने आपण प्रेग्नेंट आपण प्रेग्नंट असल्याची बातमी जेव्हा चाहत्यांना दिली तेव्हा धनश्रीवर सगळ्यांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

काल धनश्री काडगावकर हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर आपल्याला बाळ झाले असून मुलगा झाल्याचे सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत शेअर केले आहे. धनश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांना बेबी बॉय ब्लेसिंग मिळाला असल्याचे सांगितले आहे व बाळाची व तिची तब्येतही ठीक असल्याचे तिने सांगितले आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली वहीनीसाब म्हणजे नंदिता आता खर्‍या आयुष्यात आई झाली आहे! धनश्रीच्या या गोड बातमीमुळे कालपासून संपूर्ण महाराष्ट्रातुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे! धनश्रीला आई झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा! आता धनश्री म्हणजेच वहिनीसाब आपल्या युवराजांचे फोटो  मीडिया समोर कधी दाखवेल याची सगळे प्रेक्षक प्रतीक्षा करत आहे.

Leave a Reply