आमिर खानचा विवाहित पुतण्या इम्रान खान ला झाले आहे आपल्या शेजारणीवर प्रेम…!

0
629
imran-khan-love-story-viral-latest-news-amir-khan-in-marathi

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आमिर खानचा’ पुतण्या व बॉलिवुड अभिनेता इम्रान खानच्या पर्सनल आयुष्यामध्ये खूप गोंधळ निर्माण झाला आहे. एकीकडे त्याचे बॉलीवुड करियर पूर्णपणे समाप्त झाले असून आता त्याचे वैवाहिक जीवन देखील संपुष्टात येणार आहे अशी बातमी आली आहे. तो लवकरच आपल्या पत्नीपासून वेगळा होणार आहे.

अनेक सुपरहिट पिक्चर दिल्यानंतर देखील आमिर खानचा पुतण्या इम्रान खान बॉलीवुड इंडस्ट्री मधून अचानक गायब झाला होता. अमेरिकेतील रहिवासी असलेला इम्रान खान आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये हवे तसे आपले पाय होऊ शकला नाही. अचानक बॉलिवुडमध्ये एक्झिट घेऊन तो अमेरिकेमध्ये निघून गेला. काही वर्षांपूर्वी हा इम्रान खान याने अवंतिका मलिक हिच्यासोबत विवाह केला होता.

विवाहानंतर अवंतिका मलिक व इम्रान खान यांचे फारसे सुत जुळू शकले नाही. त्यांच्या डिवोर्सची चर्चा सर्वत्र होत असताना अनेक विषय समोर येत होते अवंतिका आणि इमरान यांच्या वेगळे होण्याबद्दल अनेक बातम्या मीडियामध्ये पसरल्या होत्या. ज्यामध्ये इम्रान खान यांचे घसरलेले बॉलीवूड चे करियर व फेल गेलेला अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न देखील एक कारण मानले जात होते.

मात्र आत्ताच आलेल्या काही बातम्या नुसार असे दिसून आले आहे की इम्रान खान व त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्यात डिवोर्स होण्याचे एक कारण इम्रान यांच्या राहणारी शेजारीन आहे. इमरान यांच्या अमेरिकेच्या घराशेजारी राहणारी शेजारीन लेखा वॉशिंग्टन या दोघांच्या नात्यांमधील तफावत वाढण्याचे कारण मानले जात आहे. लेखा वॉशिंग्टन स्वतः एक अभिनेत्री व मॉडेल असून इम्रान खान सोबत अनेक पार्टी व इवेंटमध्ये सोबत स्पॉट केली गेली आहे.

असे म्हटले जाते की इम्रान खान आणि लेखा वॉशिंग्टन एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड आहेत मात्र सगळीकडेच एकमेकांसोबत फिरणारे इमरान खान आणि लेखा वॉशिंग्टन यांच्या बद्दल आता नवीन चर्चेला उधान आले आहे. लेखा वॉशिंग्टन यांचे पती प्लैबो चॅटर्जी देखील इम्रान खान चे चांगले मित्र आहेत.

आता ही बातमी कितपत खरी आहे हे अजून समजायला वेळ लागेल मात्र लेखा वॉशिंग्टन आणि इम्रान खान यांची जवळील मिडियामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे आणि कदाचित अवंतिका व इम्रानच्या  डिवोर्सचे कारणही लेखा वॉशिंग्टन असू शकते असा अंदाज बांधला जात आहे.

अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इम्रान खान ला भारतामध्ये सेटल व्हायचे होते, मात्र तो अमेरिकेचा नागरिक असल्यामुळे त्याला ते शक्य झाले नाही. इम्रान खान हा नेटिव्ह अमेरिकन असल्यामुळे तो आता भारतातून परतून परत अमेरिकेत निघून गेला आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा पुतण्या असून देखील इम्रान खानला आपले पाय बॉलिवूडमध्ये रोवता आले नाही व काही खास यश मिळाले नाही.

Leave a Reply