ट्रूकॉलर’ला तुमचं नाव आणि फोटो परफेक्ट कसं काय येतं? चला तर मग जाणून घेऊया…

0
346
Truecaller

आपल्याला आधी कधी कोणत्या अनोळखी नंबरवरुन कॉल आला की थोडी धाकधूक व्हायची, हा नंबर कोणाचा,काही फ्रॉड तर नसेल ना, अशी नको नको ती शंका मनात यायची, पण आता मात्र असं होत नाही.
कारण आता आपल्या सर्वांकडे ट्रूकॉलर’ हे ॲप हमखास असतच.

Truecaller 01

ट्रूकॉलर वर आता कोणाचा कॉल येतंय हे ही समजत, इतकी सोयीस्कर सुविधा त्यानं केली आहे. आता फोनची रिंग वाजली की नंबर आणि त्यासोबतच येतं ते फोन करणाऱ्या माणसाचं नांव कधी कधी फोटोही. हे शक्य झालं आहे ते फक्त ट्रूकाॅलरमुळं!

आश्चर्य म्हणजे ही माहिती चूक नसते. आज आपण ही माहिती इतकी कशी परफेक्ट असते हे आपण माहीत करुन घेऊ.

साधारणपणे पाच वर्षांपूर्वी ही सुविधा सुरु झाली ती दोन इंजिनीअर्सना तंत्रज्ञान क्षेत्रात काहीतरी वेगळं. काहीतरी हटके करायचं होतं. त्यावेळेस ज्या दोघांनी हे तंत्रज्ञान विकसित केले ते तंत्रज्ञान जगात प्रचंड मोठया वापरलं जात.

आता करोडो लोक स्मार्टफोन वापरतात. त्यांना येणारे नाना तऱ्हेचे फोन ते फेक आहेत, स्पॅम आहेत का हे सर्व केवळ ट्रू काॅलर वापरत असल्यामुळे समजते. आणि विशेष म्हणजे हे काम बिनचूक आहे.मग सामान्य माणसाला पडतो तो प्रश्न. कसं चालतं हे ट्रू काॅलरचे काम? ते इतके बिनचूक कसे असते? याचे अजून कोणते फीचर्स आहेत?

Truecaller 05

जेंव्हा तुम्ही ट्रू काॅलर अॅप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करता त्याचवेळी तुम्ही त्या एका मोठ्या गटात सामील होता ज्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये ट्रू काॅलर अॅप घेतलं आहे.
तुम्ही तेंव्हा ट्रू काॅलरचे वापरकर्ते बनता आणि तेंव्हा ट्रू काॅलर तुम्ही मान्य केलेल्या अटींचा भाग म्हणून तुमच्या फोनमधील फोन नंबर्सचा डाटा अॅक्सेस करुन घेतो. ही फोन नंबर्सची यादी कंपनीच्या सर्व्हरकडे पाठवली जाते.

त्यामुळे तुम्ही ज्या नावावर तुमचे सिम कार्ड घेतले आहे तो नंबर, मेल आयडी, इतर काॅन्टॅक्ट नंबर हे सुरक्षितपणे ट्रू काॅलरला अपलोड करणं सहज शक्य होते. त्यामूळे समोरच्या अनोळखी व्यक्तीला आपला कॉल आला की कोणाचा कॉल आला आहे हे समजते. आता आपल्याला बऱ्यचादा समोरील व्यक्तीचा फोटो देखील कॉल आल्यावर दिसतो.

काॅल करणाऱ्या माणसाचं नांव समजतं हे जितकं यात आहे तितक्याच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply