लॉकडाऊनमध्ये ‘अग्गंबाई सासूबाई’ मधील आसावरी (अभिनेत्री निवेदिता सराफ) जोपासतेय हे छंद

0
505
Nivedita Saraf

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका हि अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेत. या मालिकेतील सर्वांची लाडकी आसावरी म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ लॉकडाऊनमध्ये घरी कसा वेळ घालवतेय हे जाणून घायची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

Also See : Aala to rang punha aala Agga Bai Sasubai Song Lyrics

लॉकडाऊनमुळे कलाकार देखील घरीच आहेत त्यामुळे त्यांच्या घरातील अशी एक जागा जिथे बसून वेळ कसा जातो हे कळत देखील नाही, अशा जागेबद्दल विचारलं असता अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या, “दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी घराचं नूतनीकरण केलं,तेव्हा मुलाच्या बेडरूममधली गॅलरी मला हवा तशी बांधून घेतली होती. घर १३ व्या मजल्यावर असल्यानं छान हवा येते. इथं बसून कॉफी पिणं आणि गाणी ऐकणं हे दोन माझे आवडते छंद आहेत.”

Leave a Reply