भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आता रुपेरी पडद्यावर सादर होणार आहे. या महान राजाच्या व्यक्तिरेखेचा प्रत्येक पैलू एका चित्रपटात टिपणे शक्य नाही! अशा शब्दात निर्माते, डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराजांचे वर्णन केले आहे .डॉ. अमोल कोल्हे यांचे ‘जगदंब क्रिएशन्स, शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट सादर करत आहेत त्या निमित्ताने त्यांनी संवाद साधला.

जगदंब क्रिएशन्सने यापूर्वीच शिवाजी महाराजांच्या जीवनातील ‘वाघनखं, ‘वचपा’ आणि ‘गरुडझेप’ या तीन प्रतिष्ठित अध्यायांची नावे जाहीर केली आहेत. या महाकाव्य प्रवासात डॉ घनश्या राव आणि विलास सावंत हे सहनिर्माते असतील!
पहिला अध्याय, ‘वाघनखं’ 6 नोव्हेंबर 2020 रोजी रिलीज होणार आहे. प्रताप गंगावणे लिखित चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक केंधे करताना दिसणार आहे. शिवाजी महाराजांची भूमिका कोण करत आहे याचा विचार करताना तुम्हाला दुसरा अंदाज लावावा लागणार नाही?कारण याही चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे, जो छोट्या पडद्यावरही मराठा इतिहासाचा चेहरा आहे तेच भूमिका साकारणार आहेत
शिवाजी महाराजांच्या आग्य्राहून सुटकेचा प्रसंग या चित्रपटातून जिवंत करण्यात येणार आहे. आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर ते बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून छत्रपती आग्य्राहून निसटले. हाच थरार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अमोल कोल्हे यांनी या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘मराठी स्वाभिमानाचा अंगार… काल, आज आणि उद्याही… शिवप्रताप गरूडझेप…2022’ असं त्यांनी हा टीझर शेअर करताना लिहिलं आहे. या चित्रपटाचा उद्देश मनोरंजन हा नसून, तरूणांमध्ये ‘मराठा स्वराज्या’चा पाया असलेल्या मूल्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.