नाकावरच्या तीळ नेमकी काय सांगतो जाणून घ्या…!

0
888
secret-behind-birth-mark-face-ear-nose-lips-chicks-reason-behind
‘अब मैं समझा तेरे रुख़्सार पे तिल का मतलब ,
दौलत-ए-हुस्न पे दरबान बिठा रक्खा है’..
‘क़मर मुरादाबादी’ ह्यांचा हा शेर तिल म्हणजे आपल्या मराठीतील तीळ विषयी बरंच काही सांगून जातो. तिला कोणी तीळ म्हणतं तर कोणी ब्युटी स्पॉट, पण एव्हढ्याश्या काळ्या ठिपक्या मुळे चेहऱ्याचा रुबाब वाढतो एव्हढे मात्र खरं.

शरीरावर जन्मतःच जे छोटे-छोटे काळे ठिपके असतात त्यांना तीळ म्हणतात. तिळाला मस असेही म्हणतात. मेलॅनीन हे रंगद्रव्य असलेल्या पेशींपासून तीळ तयार होतात. काहींना जन्मापासूनच शरीरावर तीळ असतात आणि त्यामुळे त्यांना ‘जन्मखूण’ मानतात. परंतु बऱ्याचदा हे तीळ लहान वयात, पौगंडावस्थेत किंवा गरोदरपणात शरीरावर वाढू शकतात.

बहुधा वाढत्या वयाबरोबर ते दिसेनासे होतात. शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ वाढू शकतात. ते आकारमानाने लहान-मोठे असून चपट (सपाट) किंवा त्वचेच्या वर उंचवट्यासारखे असतात. दुसऱ्या प्रकारच्या तिळाला फुगीर तीळ म्हणतात. त्यांचा रंग फिकट तपकिरी ते निळसर-काळा असतो. बहुतेक तीळ लहान असतात आणि त्यांच्या दृश्यरूपात सहसा बदल होत नाहीत.

पण नेहमी चेहऱ्याची सुंदरता वाढवणारी ही तीळ कधी कधी धोक्याची घंटा वाजवणारी ही असू शकते. काही वेळा तिळावर लांब व गडद केस असतात. अशा केसयुक्त तिळामध्ये कर्करोग उद्भवण्याचा संभव अधिक असतो. म्हणूनही तीळ जर तुमच्या शरीरावर असेल तर लगेच सावध व्हा.

तीळचे तांत्रिक नाव नेव्हस (अनेकवचन: नेवी) आहे. हे जन्म चिन्हा साठी लॅटिन शब्दापासून येते. शरीरावर असलेल्या प्रत्येक तीळाचं काहीना काही रहस्य असतं. आपल्या शरीरावर हा तीळ का आहे हा प्रश्न अनेकांना कधीना कधी पडतोच. समुद्रशास्त्रात ( सामुद्रिक शास्त्र ) शरीरावरील तिळाबद्दल सविस्तर सांगण्यात आले आहे.

देवाने प्रत्येक मनुष्याचे शरीर वेगवेगळे बनवले आहे. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा, शरीरयष्टी भिन्न असते. एवढेच नाही तर प्रत्येकाच्या त्वचेचा रंग वेगवेगळा असतो. मनुष्याच्या शारीरिक बनावटीवरून त्याचा स्वभाव व चारित्र्याबद्दल जाणून घेणे शक्य आहे. या विद्येला ‘सामुद्रिक शास्त्र’ किंवा ‘शरीर लक्षण विज्ञान’ असे म्हणतात. सामुद्रिक शास्त्र ह्याचा उल्लेख गरुड पुराणात येतो.

शरीरावरील प्रत्येक भागाच्या तिळाचं वेगळं रहस्य असतं. काही तीळ हे विचारांमध्ये असलेली सुंदरता दर्शवतात. तर काही तीळ व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू समोर आणतात. अनेकांना आपल्या तीळाशी निगडीत रहस्य जाणून घ्यायचे असते. गालावरचा तीळ सौंदर्याचं प्रतिक मानलं जातं. आज आपण याबद्दल अधिक जाणून घेऊया.

• जर कोणत्या व्यक्तीच्या नाकाच्या सुरुवातील म्हणजे समोर मध्यभागी तीळ असेल तर असे लोक कल्पनाशील असतात. कोणतंही काम हे लोक रचनात्मक पद्धतीनं करणं पसंत करतात.
• जर कुणाच्या नाकावर तीळ असेल तर ते व्यक्ती खूप प्रवास करणारे असतात. अशा व्यक्तींना प्रेमप्रकरणांमध्ये काही समस्या येऊ शकतात.

• जर कुणाच्या डाव्या डोळ्याच्या अगदी खाली तीळ असेल तर ती व्यक्ती कामुक असते. त्यांच्या जोडीदाराला त्यांचा हा स्वभाव जानवतो.
• ज्यांच्या डाव्या डोळ्याच्या कॉर्नरला तीळ असतो, ते आपल्या जोडीदारासोबत खूप भांडतात. आपल्या प्रियसी किंवा प्रियकराला मिळविण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात.
• डाव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असले तर समजून घ्या ते डोक्यानं खूप जलद असतील. असे लोक आपल्या धोरणांमुळे मोठ्या प्रयत्नांनी कामांमध्ये यश मिळवू शकतात.
• दोन्ही भुवयांच्यामध्ये जर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप हुशार असते. हे लोक आपल्या तल्लख बुद्धीनं कार्यात यश आणि पैसा प्राप्त करू शकतात.
• जर कोणत्या व्यक्तीच्या उजव्या बाजूला डोळ्यांच्या कॉर्नरवर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप भावूक असते. असे लोक दुसऱ्यांवर जळणारे पण असू शकतात.
• उजव्या गालावर तीळ असणारे व्यक्ती खूप कामुक असतात. पण वेळोवेळी त्यांचे जोडीदारासोबत मतभेद होत असतात.
• ज्यांच्या डाव्या बाजूला गालाच्या हाडावर आणि कानाच्या थोडं दूर तीळ असेल, त्यांची बौद्धिक क्षमता खूप चांगली असते. त्यांना एकसारखं जीवन जगणं आवडतं. काळासोबत आयुष्य बदलणं त्यांना आवडत नाही.
• उजव्या बाजूला नाकाच्या बरोबर खाली तीळ असेल तर ते व्यक्ती विचारांनी खूप श्रेष्ठ असतात. मात्र असे व्यक्ती खूप गूढ असतात. आपलं कोणतंही सिक्रेट ते इतरांना समजू देत नाहीत. त्यांचं भाग्य उत्तम असतं.
• जर नाकाच्या मध्ये खाली तीळ असेल तर अशा व्यक्तींना स्वतंत्रपणे जगणं आवडतं. त्यांना प्रवास खूप आवडतो.
• ज्या लोकांच्या ओठांच्यावर डाव्या बाजूला तीळ असतो ते लोक आपल्या मुलांवर खूप प्रेम करणारी असते. त्यांच्या उदारपणामुळे कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. हे लोक विश्वास करण्यासारखे असतात.
• जर कुणाच्या नाकावर उजव्या बाजूला तीळ असेल ते व्यक्ती खूप कलात्मक पद्धतीनं काम करतात. असे लोक अनेकदा आपल्या कामांनी दुसऱ्यांना धक्का पोहोचवतात. यांचे अनेक प्रेम प्रकरणं होऊ शकतात. मात्र लग्नानंतर हे व्यक्ती आपल्या जोडीदाराप्रतीच समर्पित असतात.
• ज्या लोकांच्या डाव्या बाजूला गालाच्या हाडावर आणि कानाच्या अगदी जवळ तीळ असेल, त्यांना समजून घेणं खूप कठीण असतं. असे लोक चांगले नियोजन करू शकतात.
• ज्यांच्या चीनवर म्हणजेच दाढीवर तीळ असतो, ते व्यक्ती परंपरावादी असतात. असे लोक कुटुंबियांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. इतर लोकांशी त्यांचे संबंध चांगले असतात. तसे तर हे लोक स्वभावानं खूप शांत असतात, मात्र कधी-कधी त्यांना राग येतोच. कोणतंही काम हे लोक प्रामाणिकपणे करतात.

थोडक्यात काय तर व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रकृती तितक्या तीळ आणि तीळ तेवढे अंदाज. हा पण एक मात्र खरं कि , नाराज जोडीदाराला खुश करण्यासाठी कमीत कमी आपण एव्हढे तरी निश्चितच म्हणू शकतो कि ‘ये जो तेरे चेहरे पे तिल है , वही तो मेरा दिल है’ , नाही का ?

Users who found this page were searching for:

    डावे दोळाय खालि तिळ काय सांगतो,

Leave a Reply