देशाच्या संरक्षणमंत्र्यांनाही ‘पुष्पा’चं लागलं वेड, ते ही म्हणाले “फ्लावर नही फायर है!

0
380
Rajnath Singh

दक्षिणात्य सिनेमा ‘पुष्पा’चं खुळ अजूनही लोकांच्या डोक्यातूम उतरलं नाहीय. आज जवळपास महिना होत आला या सिनेमाचं क्रेज अजूनही आहे. अल्लू अर्जुनच्या स्टाईलपासून ते डायलॉगपर्यंत सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

नुकतेच उत्तराखंडमधील गंगोलीहाटमध्ये झालेल्या एका जाहीर सभेमध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनतेला संबोधित केले, त्यादरम्यान त्यांनी पुष्पा या चित्रपटातील डायलॉगबाजी केली. सीएम पुष्कर सिंह धामी यांच्या नावाशी जोडून एक वेगळ्याच पध्दतीने एक डायलॅाग म्हंटला आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा रंगत आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांचे नाव देखील पुष्कर आहे. पण मग काँग्रेसने पुष्कर हे नाव एकूण फुल समजू नये, असं राजनाथ सिंग म्हणाले आहेत.

Rajnath Singh

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विरोधकांना डायलॅाग मारत ,आमचा पुष्कर नुसता फुल नसून फायर आहे असा थेट इशारा दिला आहे. पुढे त्यांनी आमचं पुष्कर कधीच हारणार नाही आणि माघारही घेणार नाही. या भाषणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार टिकास्त्रव केल्याचे दिसून आले.

Leave a Reply