दिपासमोर उघड झाले ‘हे’ सत्य ; तोडली सौंदर्यासोबतची सगळी नाती

0
306
The truth of 'this' was revealed to Deepa; All relationships with broken Saundarya

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत नवे ट्विस्ट येणार आहे . हि मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली असून या या मालिकेत सध्या अनेक रंजक वळणं पाहायला मिळत आहे. सध्या या मालिकेत दिपिका आणि कार्तिकी यांना त्यांच्या खऱ्या आई-वडिलांविषयीची माहिती हळूहळू कळू लागलं आहे.आता दिपिका आपलीच लेक असल्याचं दिपाला समजणार आहे. विशेष म्हणजे सौंदर्यानेच दिपिकाला तिच्यापासून वेगळं केल्याचं सत्य दिपासमोर येणार आहे.

rang maza vegla star pravah serial

सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिपाला तिची दुसरी मुलगी दिपिकाविषयीचं सत्य कळणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. सौंदर्यानेच दीपिकाला हॉस्पिटलमधून घेऊन जाते हे दिपाला कळतं. त्यामुळे दुखावलेली दिपा सौंदर्याला जाब विचारते. तसेच या कृत्यामुळे नाराज झाल्याने ती तिच्यासोबत असलेले सगळे नातेसंबंध तोडून टाकते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कार्तिकीला कार्तिकच आपले बाबा असल्याचं कळतं. त्यानंतर, दिपाला, दिपिकाविषयीचं सत्य कळावं यासाठी सौंदर्याचं पुढाकार घेते. मात्र, यामध्ये दिपाचा गैरसमज वाढतो आणि त्यातूनच ती सौंदर्यासोबतचे नाते तोडते. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

Leave a Reply