धनुषपासून वेगळं झालेल्या ऐश्वर्यानं घेतला मोठा निर्णय, चाहत्यांना बसला धक्का!

0
372
Aishwarya, who was separated from Dhanush, took a big decision, shocked the fans

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांच्या वैवाहिक आयुष्य संपवण्याच्या बऱ्याच चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांचं १८ वर्षांचं वैवाहीक नातं संपवत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आपल्या या निर्णयाची माहिती या दोघांनी एक स्टेटमेंट सोशल मीडियावर शेअर करत दिली होती. आता वैवाहिक नातं संपल्यानंतर धनुषची पत्नी ऐश्वर्या रजनीकांतने आणखी एक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे धनुषच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

aishwaryaa dhanush rajnikant

 

काही दिवसांपूर्वीच धनुषनं पूर्वश्रमीची पत्नी ऐश्वर्याला ९ वर्षांनंतर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पुनरागमन केल्याच्या शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली होती. त्याची ही पोस्ट बरीच चर्चेत होती. या पोस्टमध्ये धनुषनं ऐश्वर्याचा उल्लेख मैत्रीण असा केला होता. त्याच्या या पोस्टनंतर ऐश्वर्यानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये मोठा बदल केला आहे. तिनं आपल्या सोशल मीडियावर हॅन्डलवरून धनुषचं नाव हटवलं आहे. मात्र दोघांमध्ये घडलेल्या या वादामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

aishwaryaa dhanush

ऐश्वर्यानं तिच्या ट्विटर हॅन्डवरून धनुषचं नाव काढून टाकत आता तिने ते नाव ऐश्वर्या रजनीकांत असे केले आहे. मात्र युजरनेम अद्याप ऐश्वर्या आर धनुष असंच आहे. त्याआधी तिने तिच्या इन्स्टाग्रामवर हॅन्डलच्या बायोमधूनही धनुषचं नाव काढून टाकलं होतं. मागच्या आठवड्यात धनुषनं ऐश्वर्याचं गाणं ‘पयानी’साठी शुभेच्छा दिल्या होत्या. ऐश्वर्याच्या दिग्दर्शनात तयार झालेलं हे गाणं हिंदी, मल्याळम, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये प्रदर्शित झालं आहे.dhanush

Leave a Reply