हिंदी सिनेृष्टीतही ओळख व्हावी म्हणून केलं असावं लग्नं, हृता दुर्गुळे होतेय ट्रोल

0
384
Marriage should have been done to be known in Hindi cinema too, Hruta Durgule Hotey Troll

झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं या लोकप्रिय मालिकेतील आपली लाडकी दीपू म्हणजेच हृता दुर्गुळे. नुकतीच तिनं आणि आणि इंद्राने किचन कल्लाकारमध्ये हजेरी लावली. दीपूची भूमिका मालिकेत ऋता दुर्गुळे साकारताना दिसत आहे. तर इंद्राच्या भूमिकेत अजिंक्य राऊत दिसत आहे. छोट्या पडद्यावर दीपू आणि इंद्राची जोडी लोकप्रिय आहे. फुलपाखरू या मालिकेमुळे हृता दुर्गुळेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

hruta durgule prateek shah

मात्र नुकतेच तिने किचन कल्लाकारमध्ये आपल्या वैय़क्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला. किचन कल्लाकारमध्ये संकर्षण कऱ्हाडेने हृता दुर्गुळेनला एक प्रश्न विचारला की, सोशल मीडियावर तुला अशा कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागला ज्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला. यावर हृताने तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेबद्दल सांगितलं.

hrutadurgule

ती म्हणाली की –

मी जेव्हा प्रतीक शाहला डेट  करत असल्याचे सांगितले तेव्हा मला लोकांनी खूप वाईट पद्धतीनं ट्रोल केलं. त्यावेळी खरतर मी स्तब्ध होते, कोणाला काय उत्तर द्यायचं हे समजत नव्हतं, मी खूप निराश झाल्याचे देखील तिनं म्हंटल.

हृता पुढे म्हणाली की, माझा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. मी कधीही माझ्या वैयक्ति आय़ुष्याबद्दल सोशल मीडियावर काही पोस्ट केले नव्हते. माझे सोशल मीडियावर 2.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. पण मला वाटलं की, माझ्या आयुष्यातील ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ती मी सगळ्यांसोबत शेअर केली. म्हणून मी हिंदी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधीत प्रतीक शाहसोबत साखरपुडा करत असल्याचे सांगितले. यावेळी लोकांनी मला बरेच ट्रोल केले. अशा काही बऱ्याच गोष्टींना मला सामोरे जावे लागले.

hrutadurgulephoto

Leave a Reply