बीडच्या शेतकऱ्याची लेक ठरली ‘मिस महाराष्ट्र’

0
492
Beed farmer's lake named 'Miss Maharashtra'

बीडच्या शेतकऱ्याची लेक ठरली ‘मिस महाराष्ट्र’

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मातावली गावातील प्रतिभा बबन सांगळे हिला मिस महाराष्ट्रचा किताब मिळाला आहे. मिस महाराष्ट्रचा किताब पटकावणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या प्रतिभेचे सर्वत्र कौतुक होत आहे. बीड जिल्ह्यातील प्रतिभा बबन सांगळे या मुलीने मिस महाराष्ट्रचा किताब मिळवून बीड जिल्ह्याचा दर्जा अभिमानाने उंचावला आहे. प्रतिभा सध्या पोलीस दलात कार्यरत आहे. सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या कलागुणांनी मिळवलेले यश सांगळे कुटुंबाला तिचा अभिमान वाटत आहे. प्रतिभाला आधीपासूनच काहीतरी वेगळं करायचं होतं. गेल्या काही दिवसांपासून तिला मिस महाराष्ट्रचा किताब खुणावत होता. नुकत्याच पुण्यात झालेल्या स्पर्धेत तिला हा किताब मिळाला.

Pratibha Sangale miss maharashtraMiss-Maharashtra

प्रतिभा पोलीस दलात कार्यरत असून ती चांगली कुस्तीपटूही आहे. तिला मॉडेलिंग आणि वाचनाचीही आवड आहे. आता ती मिस इंडिया होण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. प्रतिभा एकीकडे पोलीस दलात कुस्ती आणि दुसरीकडे मॉडेलिंगची जोड देत सर्व महिलांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे. मिस महाराष्ट्रच्या घवघवीत यशानंतर तिला आता मिस वर्ल्ड बनायचे आहे. त्यासाठी ती प्रयत्नशीलही आहे. या सर्व यशानंतर पोलीस दलासह बीड जिल्ह्यात तिचे कौतुक होत आहे.

pratibha sagale pratibha sagale photoMiss-Maharashtra winner

Leave a Reply