चला हवा येऊद्याच्या सेटवर, अक्षय कुमारने श्रेया बुगडेला गिफ्ट दिली ही खास गोष्ट

0
326
On the set of Bachchan Pandey Team Chala Hawa Yeudya, Akshay Kumar gave a gift to Shreya Bugde.

चला हवा येऊ द्या या शोची आता हिंदी चित्रपट सृष्टीला चांगलीच भुरळ पडली आहे. बरेच हिंदी सिनेमे आपल्या चित्रपटाचे प्रमोशन व्हावे म्हणून रोहित शेट्टी, अक्षय कुमार नेहमीच कलाकारांसोबत हजेरी लावताना दिसतात. चला हवा येऊ द्या या शोचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

नुकतेच या सेटवर या आठवड्याच्या विशेष भागात अक्षय कुमार आणि क्रीती सेनन यांनी चला हवा येऊ द्या च्या मंचावर उपस्थिती लावली आ​​हे. सोमवार आणि मंगळवारच्या चला हवा येऊ द्या च्या शोमध्ये बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी रंगणार आहे. अक्षय कुमार आणि क्रीती सेनन यांनी सुरुवातीलाच चित्रपटातील गाण्यावर रोमँटिक डान्स केलेला पाहायला मिळणार आहे.

Chala Hawa Yeudya Akshay Kumar Shreya Bugde

यंदाच्या या भागात विशेष म्हणजे अक्षय कुमारने श्रेया बुगडेला एक खास गिफ्ट केले आहे. श्रेया बुगडे चला हवा येऊ द्या या शोसोबतच किचन कल्लाकार या शोचे सूत्रसंचालन करते. किचन कल्लाकारच्या मंचावरून घेतलेले सेल्फी आणि फोटोज ती तिच्या सोशल अकाउंटवर अपलोड करताना दिसते. मात्र श्रेयाने आजपर्यंत म्हणजे गेल्या ८ वर्षांपासून ज्या शोचा अविभाज्य घटक बनली आहे त्या चला हवा येऊ द्या च्या मंचावर कधीच फोटो काढत नाही.असा आरोप अक्षयने श्रेयावर केला आहे. याच कारणामुळे अक्षयने श्रेयाला मोबाईल गिफ्ट केला आहे. जेणेकरून ती चला हवा येऊ द्या च्या मंचावर फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करू शकेल. म्हणूनच अक्षय कुमारने खास असे गिफ्ट तिला दिले आहे.

अक्षय कुमारने चला हवा येऊ द्या शोमध्ये सहभागी होऊन प्रेक्षकांना हसवलं आहे. त्याचबरोबर अक्षय कुमार आणि क्रीती सेनन यांनी बच्चन पांडे हा सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम द्यावे असेही आवाहन केले आहे.shreyabugde

Leave a Reply