दिव्या अग्रवाल आणि वरुण यांचा इतक्या वर्षानंतर ब्रेकअप… काय आहे कारण?

0
455
Divya Agarwal and Varun's breakup after so many years ... what is the reason

बिग बॉस ओटीटीची विजेती दिव्या अग्रवाल आणि स्पिल्ट्स विला गाजवणारा वरुण सूद यांचं नातं संपलेल आहे, याबाबतची माहिती दिव्याने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली आहे.

दिव्याने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करून तिची बाजू मांडली आहे. ती आणि वरुण नेहमीच चांगले मित्र राहतील असेही शेवटी सांगितले आहे.

दिव्या अग्रवालने केलेली पोस्ट –

दिव्या अग्रवालने पोस्ट शेअर करत लिहिले –

“आयुष्य हे सर्कससारखे आहे, आणि माझ्यासोबत जे काही होत आहे त्यासाठी मी त्याला किंवा मला दोषी अजिबात ठरवत नाही. मला वाटतं आता सर्व संपलं आहे आणि ते ठीक आहे.. मला श्वास घ्यायचा आहे आणि माझ्यासाठी जगायचं आहे. मी याद्वारे औपचारिकपणे घोषित करते की मी स्वत:च माझ्यासाठी उभी राहिले आहे आणि मला माझे जीवन माझ्या पद्धतीने जगण्यासाठी वेळ देण्याची गरज वाटते आहे. रिलेशनशीपमधून बाहेर पडणे ही माझी निवड होती. बाकी इतरत्र काही कारण नव्हते.

divya agarwal and varun sood

पुढे अभिनेत्रीने लिंहिलं आहे की, “त्याच्यासोबत घालवलेले सर्व आनंदाचे क्षण मला खूप आठवतात आणि आठवतील. तो चांगला मुलगा आहे ! आणि तो माझा नेहमीच चांगला मित्र राहील. आणि माझ्या चाहत्यांनी माझ्या या निर्णयाचा आदर करावा.” असं कॅप्शनमध्ये लिहित तिने एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

Leave a Reply