श्रेयस तळपदे दिसणार पुन्हा एकदा नव्या भूमिकेत…जाणून घ्या नक्की भूमिका काय?

0
346
Shreyas Talpade will appear again in a new role ... Find out exactly what the role is

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. श्रेयसने त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केला असून त्याचे हे पोस्टर आणि चित्रपट सध्या चर्चित आहे.

shreyas talpade Kaun hai Pravin Tambe

श्रेयसच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून हा एक बायोपिक आहे. श्रेयसने ‘इक्बाल’ या चित्रपटात क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे’ असं या बायोपिकचं नाव असून यामध्ये क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून ‘इंडियन प्रीमिअर लीग’मध्ये (IPL) पदार्पण करणाऱ्या तांबेंनी हे दाखवून दिलं की, वयानुसार स्वप्नांची व्याख्या करता येत नाही.

 

श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या आगामी बायोपिकचा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. येत्या 1 एप्रिल रोजी हा चित्रपट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कौन है प्रवीण तांबे? क्रिकेटमधील सर्वांत अनुभवी पदार्पण आणि सर्वांत प्रेरणादायी क्रिकेट स्टोरी’, असं कॅप्शन देत त्याने हा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर येत्या 9 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात श्रेयससोबत आशिष विद्यार्थी, परम्ब्रता चॅटर्जी आणि अंजली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. जयप्रद देसाई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.myra shreyash talpade

Leave a Reply