सोनाक्षी सिन्हा विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, कोर्टात हजर होण्याचा आदेश..

0
294
Non-bailable warrant issued against Sonakshi Sinha, order to appear in court ... What exactly is the case

२०१९ मध्ये प्रमोद शर्मा नावाच्या एका कार्यक्रम आयोजकाने सोनाक्षी सिन्हावर फसवणूक, गुन्हेगारी कट आणि विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. आता ते प्रकरण पुन्हा उघडकीस झाले आहे. बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून ओळखली सोनाक्षी सिन्हाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे.

Sonakshi Sinha arest case

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एसीजेएम न्यायालयाने सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. पैसे घेऊनही इव्हेंटला न आल्याबद्दल सोनाक्षीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताज्या अहवालानुसार, सोनाक्षीला २०१९च्या फसवणूक प्रकरणात पुढील महिन्यात उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षीला दिल्लीतील एका कार्यक्रमासाठी २८ लाख रुपये दिले गेले होते. या कार्यक्रमासाठी ती प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार होती. मात्र ती रक्कम घेऊनही सोनाक्षी या कार्यक्रमाला हजर राहिली नाही. त्यानंतर, २०१९ साली या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद शर्मा यांनी पैसे परत घेण्याचा वारंवार प्रयत्न केला. अखेरी त्यांनी सोनाक्षी सिन्हाविरुद्ध तक्रार दाखल केली.

यासंदर्भात आता, मुरादाबाद कोर्टाने फसवणूक प्रकरणात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. इतकेच नाही तर न्यायालयाने सोनाक्षीला २५ एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

Leave a Reply