अभिनेत्री भाग्यश्री मोटे माहितीय का? तिच्या लुकने चाहते झालेयत फिदा

0
438
Do you know much about actress Bhagyashree Fida is becoming a fan of her looks

स्टार प्रवाह वाहिनीवरील देवयानी फेम आणि मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. नुकतच तिने तिने पिंक रंगाच्या साडीतील हटके फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांची मने जिंकली आहेत.

नुकतेच तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर पिंक रंगाच्या साडीसोबत ब्लॉऊज परिधान केले व सोशल मीडियावर फोटो शेअर केले. या फोटोतील खास म्हणजे, तिच्या अंदा आणि नजरेचे चाहते दिवाने झाले आहे. यासोबत तिने साजेशीर दागिन्यासह मेकअप केला आहे. या फोटोच्या कॅप्शमध्ये तिने ‘I can’t stop myself from looking and noticing you, noticing me✨’ असे लिहिले आहे.

Bhagyashree Mote actress

याच दरम्यान आणखी एका फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने माझ्या लाजाळू पणाच्या मागे एक तेजस्वी, सुंदर आत्मा जळत होता!असे म्हटले आहे. या फोटोंनी तिच्या सौंदर्यात भर पडली आहे. तिचा हा लूक खूपच ग्लॅमरस आणि मनमोहक दिसत आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह मराठी कलाकारांनी कॉमेंन्टसचा पाऊस पडला आहे. यात एका युजर्सने ‘ही मेनका ’, ‘गुलाबी रंगाच्या सौंदर्यात भाग्यश्री’ तर दुसऱ्या एका युजर्सने ‘तुझे सौंदर्य आमच्या आत्म्याचा प्रकाश आहे. असे म्हटले आहे. आणखी एका युजर्सने ‘तुझ्या सौंदर्याने घायाळ केलं’ असं म्हंटले आहे.

भाग्यश्री छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ आणि ‘पाटील’ चित्रपटात दिसली होती. तिने तेलगू ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तिचे सोशल मीडियावर ४ लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.

Leave a Reply