शार्क टँक इंडिया कार्यक्रमात या मराठमोळ्या अभिनेत्याची एंट्री! व्हिडिओ होतोय व्हायरल

0
379
Entry of this Marathi actor in Shark Tank India program Video goes viral

‘शार्क टॅंक इंडिया’ कार्यक्रमाच्या झालीय मकरंद अनासपुरेची एंट्री. त्याचा एक भन्नाट असा मजेशीर व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Shark Tank India

प्रेक्षकांना नेमकं कसं हसवता येईल याची जादू एका कलाकारत असते. सध्या मनोरंजन करण्यासाठी बरेच रिअॅलिटी शो रांगेत आहेत.काही दिवसांपूर्वीच ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाची सुरवात झाली. या कार्यक्रमात एका नव्या युवा व्यवसायाकाला व्यवसाय सुरू करण्यासाठी निधी दिला जात आहे. जागतिक स्तरावर गाजलेल्या एका बिझनेस रिअॅलिटी शोचा हा पहिला सीझन आपल्या देशात पहिल्यांदाच सादर होणार आहे.या शो चे परिक्षण अश्नीर ग्रोव्हर , पियुष बन्सल ,नमिता थापर , विनिता सिंग, अनुपम मित्तल करणार आहेत.

 

या शोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. शो संदर्भात प्रेक्षकांच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर सोशल मीडियावर या शोवर बनवण्यात आलेले मिम्सही जोरदार व्हायरल होत आहेत.

त्यात नुकतच एका मिम्सकर्त्यानं या शोचा एडिट केलेला एक भन्नाट व्हिडिओ केला असून हा व्हिडीओ पाहताच तुम्हाला देखील तुमचे हसत आवरता येणार नाही.

 

या व्हायरल झालेल्या व्हिडिओत ‘शार्क टँक इंडिया’च्या मंचावर मकरंद अनासपुरे आला आहे असं दिसतां. मात्र अनासपुरे काही खरोखर आलेला नाहीस. दे धक्का चित्रपटातील काही सीन या व्हिडिओत एडिट करून वापरण्यात आले असून, समोर बसलेले परिक्षक आणि मकरदं अनासपुरे यांच्यातले संवाद यांची अगदी जुळवाजुळव झालेली दिसून येतेय. हा भन्नाट असा मजेशीर व्हिडिओ सोशल मिडायावर चांगलाच गाजतोस. शिवाय या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून व्लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.Makarand-Anaspure-Photo-

Leave a Reply