दीपिकावर चाहते नाराज, करतायत ‘गहराइयां’ सिनेमाला #BoycottGehraiyaan!

0
403
Fans angry over Deepika Padukone, doing #Goyraiyaan movie

‘गहराइयां’ हा सिनेमा ११ फेब्रवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवरवरील अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला असून, या सिनेमावर सर्वांच्या तऱ्हे तऱ्हेच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, दीपिका पदुकोण, धैर्य कारवा, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा गहराइयां’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरू आहे. अनेकांनी हा चित्रपट पाहील्यानंतर काहींना चित्रपट आवडला तर काहींना आवडला नाही अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या चित्रपट त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींवर आधारीत असल्यासारखे देखील वाटले.

नेटकऱ्यांनीच नाही तर बॅालिवूड मधील कलाकारांनी या चित्रपटाला अक्षरश: नावं ठेवण्याचं दिसून आली, अभिनेता केआरकेने तर चित्रपटाला सॉफ्ट पॉर्न म्हटलं आहे. तर बॉलिवूडची क्वीन कंगनाने हा चित्रपट कचरा असल्याचे म्हटले. आणि आता ट्वीटरवर तर #BoycotBollywood हे हॅशटॅग ट्रेंड देखील होताना दिसत आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या निधनानंतर खरं हे हॅशटॅग सुरु झालेलं. त्यानंतर बऱ्याचवेळा हे हॅशटॅग सोशल मीडियावर चित्रपट प्रदर्शनानंतर पाहायला मिळालं. पण या वेळी #BoycottBollywood हे हॅशटॅग वापरत त्यांनी आता दीपिका पदुकोणला टार्गेट केले आहे.

चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी चाहत्यांनी ‘गहराइयां’ चित्रपटाला फ्लॉप असल्याचे संबोधले आहे.

Leave a Reply