सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीने घेतला काही वेळ ब्रेक…समोर आले कारण

0
343
Happiness is exactly what the actress Varsha Usgaonkar took a break from this series ... Sukh Mhanje Nakki Kay Asta

स्टार प्रवाह वाहिनवर गेल्या दोन वर्षापासून मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं सुरू असून या मालिकेला खूप चांगलीच लोकप्रियता मिळते आहे. या मालिकेतील गौरी आणि जयदीपची जोडी प्रेक्षकांना खूपच वाटते आहे. तसेच या मालिकेतील इतर पात्र देखील प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी माईंची भूमिका साकारत असून त्यांनी माईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपले घर केले आहे. या मालिकेतून वर्षा उसगावकर यांनी सध्या ब्रेक घेतल्याचे समजते आहे.

Varsha Usgaonkar

वर्षा उसगावकर यांनी मालिका सोडल्याची चर्चा सोशल मीडियावर काही दिवसांपासून रंगली होती. परंतु ही बातमी खरी नाही. तसेच सारखं काहीतरी होतय या नाटकामध्ये वर्षा उसगावकर काम करत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन संकर्षण कऱ्हाडेने यांनी केले आहे. तर या नाटकांमध्ये प्रशांत दामले यांनी मुख्य भूमिका केली आहे. तसेच या नाटकाचे प्रयोग लंडनमध्ये होणार आहे. प्रशांत दामले यांनी काही दिवसांअगोदर या नाटकाबद्दलचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. सर्व कलाकार लंडनमधील गार्डन बाहेर उभे असलेली फोटोमध्ये दिसून येते आहे.

प्रशांत दामले यांनी सांगितले की, लंडनमधील शंभर वर्ष जुने असलेल्या नाट्यगृहात आमच्या सारखं काहीतरी होतय या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकाच्या प्रयोगासाठी वर्षा उसगावकर लंडनला गेल्या आहेत.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून वर्षा उसगावकर यांनी काही वेळ ब्रेक घेतला आहे. त्यांनी मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण आगोदरच केले आहे. त्यामुळे लंडनमधील नाटकाचा प्रयोग पार पडल्यानंतर त्या पुन्हा शूटिंगला सुरूवात करणार आहेत.

Leave a Reply